IND vs SL ODI : मोठा धक्का ! मालिकेपूर्वी दोन खेळाडूंनी घेतली माघार, सामने कुठे पाहता येणार

टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका होणार आहे. ही एकदिवसीय मालिकाही 3 सामन्यांची असणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर चरित असालंकाकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या मालिकेला 2 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, ट्वेंटी-२० मालिकेत यजमान श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना दुखापत व आजारपणामुळे माघार घ्यावी लागली होती. तेच सत्र वन डे मालिकेत कायम राहिलेले दिसत आहे. पहिल्या वन डे सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या दोन जलदगती गोलंदाजांनी मालिकेतून माघार घेतली आहे.

मथिशा पथिराणाला खांद्याच्या दुखापतीमुळे आणि दिलशान मदुशंकाला हॅमस्ट्रींगमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. या मालिकेत आधीच श्रीलंकेला दुश्मंथा चमिरा आणि नुवान तुषारा यांच्याशिवाय खेळावे लागत आहे. चमिराने आजारपणामुळे आणि तुषाराने बोट फ्रँक्चर झाल्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. आता श्रीलंकेने या मालिकेसाठी अनकॅप्ड गोलंदाज मोहम्मद शिराजचा संघात समावेश केला आहे आणि टीम मॅनेजर महिंदा हलागोंडा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सामने टीव्हीवर कुठे पाहता येणार?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया एकदिवसीय मालिकेतील सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.

किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.

वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता

दुसरा सामना, 4 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता

तिसरा सामना, 7 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता

वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरित असलंका (कॅप्टन), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदु मेंडिस, जेनिथ लियानगे, निशान मदुश्का, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेल्लालगे, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, अकिला धनंजय, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना आणि असिथा फर्नांडो.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.