झिम्बाब्वेला इतिहास रचण्याची संधी, टीम इंडिया रोखू शकणार का ?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना लवकरच सुरू होणार आहे. एक दिवसापूर्वी हरारे येथे दोन्ही संघ एकमेकांशी भिडले होते.

ज्यामध्ये झिम्बाब्वेने सर्वांना चकित केले आणि नव्याने टी20 विश्वविजेत्या टीम इंडियाचा 13 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली यजमान संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

प्रथमच टीम इंडियाचे कर्णधार असलेला शुभमन गिल बरोबरीच्या इराद्याने या सामन्यात उतरणार आहे. गेल्या सामन्यात टीम इंडियाला 116 धावांचे माफक लक्ष्यही गाठता आले नाही. पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्मा, रियान पराग आणि रिंकू सिंग यांच्यावर नजर असेल.