Shendurni Nagar Panchayat Election : अपक्ष उमेदवार मिनाज बी तौसीप तांबोळी यांचा भाजपात प्रवेश

---Advertisement---

 

Shendurni Nagar Panchayat Election : शेंदुर्णी, जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधील अपक्ष उमेदवार मिनाज बी तौसिप तांबोळी व त्यांचे पती तौसीप तांबोळी यांनी राज्याचे संकट मोचक ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला तर प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपाचे उमेदवार रेश्मा अंजुम जहीर मन्सूर पिंजारी यांनी स्वतःच्या संमतीने स्वखुशीने काही कारणास्तव माघार घेतल्याने त्यांच्या जागी भाजपा निवडणूक पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेऊन त्यांच्या जागी अपक्ष उमेदवार मिनाज बी तौसिप तांबोळी यांना प्रभाग क्रमांक पाचमधील भाजपा पुरस्कृत उमेदवार असल्याचे पत्रकार परिषदेत शेंदुर्णी निवडणूक प्रभारी अँड. शिवाजी सोनार यांनी जाहीर केले.

ऍड. शिवाजी सोनार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, प्रभाग क्रमांक पाचमधील भाजपाचे अधिकृत उमेदवार रेश्मा अंजुम जहीर मन्सूर पिंजारी यांची भाजपाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असता त्या प्रभागातील कार्यकर्ते व नागरिकांच्या म्हणण्यानुसार या उमेदवारा ऐवजी अपक्ष उमेदवार मिनाज बी तौसीप तांबोळी यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह भाजपा पार्लमेंटरी बोर्डाकडे धरला. या बोर्डाने भाजपाचे अधिकृत उमेदवार रेश्मा अंजुम जहीर मन्सूर पिंजारी यांच्याशी चर्चा केली असता प्रभागाच्या विकासाच्या व कार्यकर्त, नागरिकांच्या भावनेचा आदर करून त्यांनी स्वखुशीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन माघार घेतली.

भाजपा पार्लमेंटरी बोर्डाने कायदेशीर बाजू तपासून अपक्ष उमेदवार मिनाज बी तौसीप तांबोळी यांना भाजपाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येत असल्याचे सांगितले. गरुड पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदे प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय गरुड , नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार गोविंद अग्रवाल , भाजपा तालुकाध्यक्ष कमलाकर पाटील , राजेंद्र भारुडे, सुधाकर बारी, शांताराम गुजर , राजेंद्र पवार , इमाम शेठ , नबी शहा , मन्सूर पिंजारी , स्नेहदीप गरुड, धीरज जैन, नज्जू काझी , आसिफ खलिफा , जमीर पिंजारी, निसार पहिलवान , अरुण चौधरी, पंकज सूर्यवंशी, शकूर शेख आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास – तौसीप तांबोळी

मला भाजपाचे विचारधारा व नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने मी भाजपामध्ये प्रवेश केला मी माझ्या पत्नीचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता, मात्र सर्वांच्या संमतीने माझ्या पत्नीला भाजप पुरस्कृत उमेदवारी जाहीर केल्याने आम्ही सर्वजण एकदिलाने भाजपा पक्षाच्या कमळाच्या फुलाचा प्रचार करून नगराध्यक्षांसह 17 उमेदवार भाजपाचे विजयी करू व आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल भाजपा निवडणूक समितीचे व नामदार गिरीश महाजन व संजय गरुड , गोविंद अग्रवाल व सर्व पदाधिकारी व प्रभाग क्रमांक पाच मधील कार्यकर्ते ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त करतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---