India-England ODI series : भारत आणि इंग्लंड यांच्यात ६ फेब्रुवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेला विशेष महत्त्व आहे कारण १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होत आहे. त्यामुळे या मालिकेतील सामने दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणार आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १०७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ५८ सामने जिंकले असून, इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. तीन सामने निकाल लागले नसून, दोन सामने बरोबरीत राहिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत भारताचा वरचष्मा राहिला आहे.
हेही वाचा : धक्कादायक! फक्त सीमाच नव्हे तर, तिच्या १३ वर्षीय मुलीवरही होता राहुलचा ‘डोळा’
भारतीय भूमीवरील खेळ पाहता, भारतीय संघ अधिक प्रभावी ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या ५२ सामन्यांपैकी ३४ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर इंग्लंडला केवळ १७ सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर भारतीय संघ वेगळ्याच लयीत खेळताना दिसतो.
नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत भारताचा विजय
भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच पार पडलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ४-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे आता वनडे मालिकेतही भारत आपला वर्चस्व कायम ठेवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हेही वाचा : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला संपवलं; कारण ऐकून पोलीसही हैराण
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, हर्षित राणा, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा.
इंग्लंड संघ
जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.
दरम्यान, ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर आपले वर्चस्व कायम ठेवतो का, की इंग्लंड संघ पलटवार करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. क्रिकेटप्रेमींना ही मालिका नक्कीच रोमहर्षक ठरणार आहे.