दुबई : आयसीसी चॅम्पियन्स चषकात भारतीय संघाने आपली सर्व सामने एकाच ठिकाणी खेळल्यामुळे त्यांना दुबईत कसे खेळायचे याची उत्तम जाणीव आहे, असे मत न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसनने व्यक्त केले.
भारताला एकाच ठिकाणी खेळण्याचा फायदा झाला असे मी म्हणणार नाही. पण न्यूझीलंडला लाहोरमधील परिस्थितीची चांगली कल्पना आहे, असे तो म्हणाला.
लाहोरमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ५० धावांनी विजय नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश केला. विल्यमसन आणि रचिन रवींद्र दोघांनीही शतके झळकावून न्यूझीलंडचा विजय घडवला. आता रविवारी दुबईत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ व न्यूझीलंड यांच्यात दुबईत अंतिम सामना खेळला जाणार आहे.

पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेसह गत तिरंगी मालिकेत न्यूझीलंडने लाहोरमध्ये दोन सामने खेळले होते. एक संघ जेव्हा एकाच ठिकाणी अनेक वेळा खेळतो, तेव्हा त्यांना कसे खेळायचे याची खरोखर चांगली कल्पना असते, असेही तो म्हणाला.
आम्ही जसे लाहोरमध्ये खेळलो, तसे भारतीय संघ सुद्धा दुबईत खेळला, हा क्रिकेटमध्ये अविभाज्य अंग आहे आणि म्हणून ते अंतिम फेरीत पोहोचले असे म्हणता येणार नाही, असे तो म्हणाला.
उपांत्य सामन्यात शतक झळकावल यानंतर केन विल्यमसनचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि तो अंतिम सामन्यासाठी उत्सुक आहे. आता आमचे लक्ष अंतिम सामना, त्या सामन्याचे ठिकाण, प्रतिस्पर्धी संघ, हे सर्व घटक आहेत. अर्थातच, आम्ही एकदा दुबईत भारताविरुद्ध खेळलो होतो, असे तो म्हणाला.
आता परिस्थिती वेगळी आह. गट साखळी फेरीच्या सामन्यातील काही सकारात्मक गोष्टी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहो आणि आता दोन किंवा तीन दिवसांच्या अंतराने आपण अंतिम फेरीत कसे वागण्याचे याबाबत स्पष्ट असणे महत्वाचे आहे. असे तो म्हणाला.
गट साखळी सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. हा अंतिम सामना रोमांचक होणार आहे. रचिनकडे एक अविश्वस नीयपणे विशेष प्रतिभा आहे. त्याच्यासोबत फलंदाजी करणे नेहमीच छान असते. तो संघाला प्रथम स्थान देतो व त्या स्वातंत्र्याने खेळतो. आम्ही एकमेकांना फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो, असे विल्यमसन म्हणाला.
भारत एक उत्कृष्ट संघ आहे व खरोखर चांगले खेळत आहे. आता शेवटच्या सामन्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. अंतिम सामन्यात काहीही होऊ शकते, असेही तो म्हणाला.