बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारताचा 3-1 असा दारूण पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिव्ह्यू मीटिंग बोलावली होती. या बैठकीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर उपस्थित होते. मीडिया रिपोर्टनुसार, या बैठकीत गौतम गंभीरने सरफराज खानवर ड्रेसिंग रूममधील संवेदनशील माहिती मीडियामध्ये लीक केल्याचा आरोप केला आहे.
गंभीरने मेलबर्न कसोटीत पराभवानंतर खेळाडूंवर भडकण्याबाबत इंडियन एक्स्प्रेसमध्ये छापलेल्या बातमीचा उल्लेख केला. तसेच, मिस्टर फिक्स इट नावाने आलेल्या एका रिपोर्टमध्ये विराट कोहलीने बुमराहला कर्णधार बनवण्यास विरोध केल्याचा उल्लेख होता. ही माहिती लीक करणाऱ्या खेळाडूवर गंभीरने ठपका ठेवला असून, त्याचे पुरावे सादर केलेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : शिक्षकाशी फेसबुकवर मैत्री; तरुणीने घरी बोलावलं अन् अंगावरील कपडे…, अखेर त्या प्रकरणाचा उलगडा
सरफराज खानचा वादग्रस्त इतिहास
सरफराज खानने मागील वर्षी टीम इंडियात पदार्पण केले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे त्याला संघात स्थान मिळाले. मात्र, याआधीही तो वादांमध्ये अडकला आहे.
13 वर्षांच्या सरफराजवर शाळेने खोटं वय सांगितल्याचा आरोप केला होता. पुढील तपासणीने त्याचे वय 13 असल्याचे स्पष्ट केले होते.
अनुशासनहीनतेमुळे त्याला मुंबईतील प्रशिक्षण शिबिरातून बाहेर काढण्यात आले होते.
2015 मध्ये अंडर-19 चॅम्पियनशिपदरम्यान निवडकर्त्यांच्या दिशेने आक्षेपार्ह हावभाव केल्याने त्याला संघातून वगळण्यात आले होते.
बीसीसीआयची पुढील कारवाई?
ड्रेसिंग रूममधील गोपनीय माहिती लीक होणे ही संघासाठी गंभीर बाब मानली जाते. 2019 च्या विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील वादाची बातमी लीक झाल्यानंतर काही खेळाडूंना संघाबाहेर फेकले गेले होते. त्यामुळे आता बीसीसीआय पुन्हा अशाच प्रकारची कठोर कारवाई करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.