---Advertisement---

Under 19 Asia Cup 2024: पहिल्याच सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव; 44 धावांनी मिळवला विजयी

---Advertisement---

Under 19 Asia Cup 2024: अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने होते. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडयिममध्ये खेळण्यात आला. साद बैग याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर मोहम्मद अमान टीम इंडियाची कॅप्टन्सी करत आहे.

पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50  षटकात 7 बाद 281धावा केल्या. त्यामुळे 19 वर्षांखालील भारतासमोर विजयासाठी 282धावांचे लक्ष्य होते.

या लक्ष्याचा पाठलाग करतांना, भारतीय संघाला  47.1 षटकात सर्वबाद 237 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे 19 वर्षीय आशिया कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाची निराशजनक सुरवात झाली असून,पहिल्याच सामन्यात भारताला  पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, हरवंश सिंग (विकेटकीपर), निखिल कुमार, किरण चोरमले, हार्दिक राज, मोहम्मद इनान, समर्थ नागराज आणि युधाजित गुहा.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: साद बेग (कर्णधार आणि विकेटकीपर), शाहजेब खान, उस्मान खान, फरहान युसफ, फहम-उल-हक, मोहम्मद रियाजुल्ला, हारून अर्शद, अब्दुल सुभान, अली रझा, उमर झैब आणि नावेद अहमद खान.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment