तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। ग्लोबल हंगर इंडेक्स जारी करण्यात आला असून यात भारताची १११ व्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताचा स्कोअर २८.६० आहे. हंगर इंडेक्सनुसार भारतात भूक आणि उपासमारीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
भारताची स्थिती बिकट आहे १२५ देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत १११ व्या स्थानावर आला. इतकेच नाही तर सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे प्रमाण तसेच बालकांच्या कुपोषणात ही भारत आघाडीवर आहे. २०२२ पासून भारताची स्थिती आणखी खराब झाली आहे. गेल्यावर्षी भारत या निर्देशकात १०७ व्या क्रमांकावर होता. त्यावर १११ व्या स्थानावर आला आहे.
या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा स्कोर २८.६० %आहे. यानुसार भारतात भूक आणि उपासमारीची परिस्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. हे जागतिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भुकेचे सर्वसमावेशक मोजमाप आणि मागोवा घेण्यासाठी एक साधन आहे. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने गेल्यावर्षी आणि त्याआधीच्या वर्षी म्हणजे सलग दोन वर्षे हा ग्लोबल हंगर इंडेक्स अहवाल नाकारला होता.