मोठी घोषणा ! टी 20 वर्ल्ड कपमध्ये नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार ‘भारत’

India Squad For ICC Under 19 Women T20 World Cup 2025 : भारतीय अंडर 19 महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी 2025 अंडर 19 महिला टी 20I वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंना मुख्य संघात स्थान देण्यात आले असून, 3 खेळाडूंना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे.

संघाचं नेतृत्व निकी प्रसाद करणार आहे, तर मुंबईची सानिका चाळके उपकर्णधार म्हणून काम पाहणार आहे. टीम इंडियाने 22 डिसेंबरला बांगलादेशला हरवून पहिलेच अंडर 19 आशिया कप जिंकले होते, ज्यामुळे या संघापासून वर्ल्ड कपमध्येही उच्च कामगिरीची अपेक्षा आहे.

अंडर 19 महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये 16 संघ सहभागी होणार आहेत, जे 4 गटांमध्ये विभागले जाणार आहेत. भारताच्या गटात विंडीज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे.

भारताची वर्ल्ड कप मोहिम 19 जानेवारीला विंडीजविरुद्ध सुरु होईल. त्यानंतर मलेशिया आणि श्रीलंका विरुद्ध 21 आणि 23 जानेवारीला भारताचे सामन्य होतील.

टीम इंडिया च्या खेळाडूंची यादी 

 

निकी प्रसाद (कर्णधार)
सानिका चाळके (उपकर्णधार)
जी त्रिशा
कमलिनी जी (विकेटकीपर)
भाविका अहिरे (विकेटकीपर)
ईश्वरी अवसरे
मिथिला विनोद
जोशिता व्हीजे
सोनम यादव
पारुनिका सिसोदिया
केसरी धृती
आयुषी शुक्ला
आनंदिता किशोर
एमडी शबनम
वैष्णवी एस.