India vs Bangladesh, 2nd Test । कानपूर कसोटीत पहिले तीन दिवस पाऊस होता, मात्र चौथ्या दिवशी बांगलादेशचा डावखुरा फलंदाज मोमिनुल हकने शानदार शतक झळकावले. मोमिनुलने आपल्या कसोटी कारकिर्दीत 13व्यांदा शतक झळकावण्याचा पराक्रम केला. दरम्यान, बांगलादेशचा पहिला डाव ७४.२ षटकात २३३ धावांवर संपला आहे.
बांगलादेशने आपला सलामीवीर झाकीर हसनला २६ धावांवर गमावल्यानंतर मोमिनुल हक क्रीझवर आला. यानंतर मोमिनुलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कमालीचा संयम दाखवला. त्याने विशेषतः अश्विनचा उत्कृष्ट शैलीत सामना केला.
चेन्नई कसोटीत मोमिनुलला अश्विनचा खूप त्रास होत होता, पण कानपूरमध्ये परिस्थिती वेगळी दिसत होती. मोमिनुलने आपल्या अर्धशतकासाठी 110 चेंडू घेतले आणि पुढच्या 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मोमिनुलने आपल्या खेळीत एक षटकार आणि 16 चौकार लगावले. उपाहारापर्यंत मोमिनुल 102 धावांवर नाबाद राहिला.