भारत विरुद्ध पाकिस्तान; आज पुन्हा आमनेसामने, कोण मारणार बाजी?

तरुण भारत लाईव्ह । २ सप्टेंबर २०२३। आशिया चषकातील सर्वात रोमांचक सामना आज शनिवारी होईल. त्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत – पाकिस्तान आमनेसामने असतील. दोघेही चार वर्षानंतर एकदिवसीय सामन्यात समोरा समोर येतील. याआधी २०१९ च्या विश्व्चषकात दोघेही भिडले होते. ते गेल्यावर्षी २३ ऑक्टोबर ला टी २० विश्व्चषकातही खेळले होते. आशिया चषक हाय व्होल्टेज सामना आज दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना म्हणजे दोन्ही संघातील खेळाडूंसाठी दमदार कामगिरी करून स्वतःचे नाव आपापल्या देशांच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्याची एक सुवर्णसंधी असते. केएल राहुल, श्रेयस अययर आणि बुमराह दुखापतीतून सावरले आहेत. कर्णधार रोहित शर्माने २०१८ मध्ये आशिया कपचे विजेतेपदही पटकावले आहेत. अशा परिस्थितीत भारताची बाजू वरचढ दिसते.

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आज पालेकेले आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मात्र शनिवारी पालेकेले इथे सकाळ ते दुपारपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे हा सामना उशिराने सुरु होऊ शकेल.