पाली : सुधागड तालुक्यातील तळई या छोट्याशा गावातील दिव्यांग (कर्णबधिर) चित्रकार चेतन पाशिलकर याने भारत देशाचे नाव उंचावले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या १०व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स चित्रकला स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. विशेषतः चाळीस वर्षात पहिल्यांदा भारताला हे सुवर्णपदक मिळाले आहे.
सुप्रसिद्ध चित्रकार चेतन चंद्रकांत पाशिलकर यांनी शारीरिक दृष्ट्या असलेल्या आवाहनांना जिद्दी व चिकाटीने पेलत चित्रकलेच्या दुनियेत याबरोबरच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून आमूलाग्र कामगिरी केली आहे.
फ्रान्समध्ये नुकत्याच १०व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स चित्रकला स्पर्धेत चेतनने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सुवर्णपदक पटकावले. यामुळे चेतन याने महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुधागड तालुक्यासह भारतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.