भारतीय लष्कराचा ‘ड्रोन फोर्स’ शत्रूचा काळ; ५० हजार जवानांचे प्रशिक्षण सुरू, संघर्षात प्रत्युत्तर देण्यास सक्षम…!

---Advertisement---

 

ऑपरेशन सिंदूर, रशिया-युक्रेन आणि अमेरिका इस्त्रायल इराण युद्धांनंतर भारतीय संरक्षण संस्थेने एक ड्रोन फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला. हा फोर्स कोणत्याही लष्करी कारवाईत फर्स्ट रिस्पॉडर (पहिली प्रत्युत्तर कारवाई) म्हणून तैनात केला जाईल. याला डेटा आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअर फोर्सचे तांत्रिक समर्थन मिळेल.

एकात्मिक सरक्षण मुख्यालयाच्या माहितीनुसार, या फोर्ससाठी सध्या ५० हजार लष्करी जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे. पुढील तीन वर्षात १५ नवीन ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (उत्कृष्टता केंद्रे) तयार केली जातील. येथे सिम्युलेटर आणि व्हर्चुअल रिअॅलिटीच्या माध्यमातून रिअल टाईम युद्ध प्रशिक्षण दिले जाईल. भविष्यात बीएसएफ आणि आयटीबीपीसारख्या सुरक्षा दलांनाही या नेटवर्कशी जोडले जाईल. ही फोर्स गुप्तचर, पाळत ठेवणे आणि अचूक हल्ला करण्याची दुहेरी भूमिका बजावेल. या प्रणालीला वायुदलाच्या एकात्मिक हवाई कमांड आणि लष्कराच्या आकाशतीर प्रणालीचे कवच मिळेल, ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताने स्वतःला संरक्षण उत्पादनात खूप मजबूत केले. शत्रूच्या स्वस्त ड्रोनचा सामना करण्पासाठी आता किफायतशीर सॉफ्ट किल (जॅर्मिग/स्पूफिंग) आणि हार्ड किल (लेझर-आधारित डायरेक्टेड एनर्जी वेपन) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

पुरोपीय संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘एमबीडीए सोबत एक भारतीय वायुदलाचा महत्त्वाचा करार झाला आहे. करारानुसार, राफेल लढाऊ विमानात वापरल्या जाणाऱ्या मिका एअर टू एअर क्षेपणास्त्रांची देखभाल आता भारतातच वायुदल करेल. यासाठी देशात त्यांच्या ‘देखभाल, दुरुस्ती, मिड लाईफ ओव्हरहॉल’ची सुविधा तयार केली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---