---Advertisement---

भारताच्या स्टार खेळाडूने अचानक सोडले इंग्लंड, ‘या’ कारणामुळे घेतला ‘हा’ निर्णय

---Advertisement---

---Advertisement---

Khalil Ahmed : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे ते ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील ४ सामने खेळले गेले आहेत आणि शेवटचा सामना ३१ जुलैपासून खेळला जाणार आहे. दुसरीकडे, भारतातील अनेक स्टार खेळाडू काउंटी क्रिकेट खेळत आहेत. या सगळ्यामध्ये, एका स्टार खेळाडूने अचानक इंग्लंड सोडले आहे.

भारतीय गोलंदाज खलील अहमदने एसेक्ससोबतचा आपला करार संपवला आहे. त्याने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये एसेक्ससाठी दोन प्रथम श्रेणी सामने खेळले. एसेक्सने एक प्रेस रिलीज जारी करून म्हटले आहे की वैयक्तिक कारणामुळे खलील क्लबसोबतच्या उर्वरित सामन्यांपूर्वी मायदेशी परतत आहे. त्याला जाताना पाहून आम्हाला दुःख होत असले तरी, आम्ही खलीलच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करतो आणि आम्हाला दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे आभारी आहोत.

खलील अहमदने सुरुवातीला क्लबसोबत दोन महिन्यांच्या कालावधीसाठी करार केला होता. ज्या अंतर्गत त्याला सहा प्रथम श्रेणी सामने तसेच वन-डे कपचे दहा संभाव्य लिस्ट ए सामने खेळायचे होते. पण तो एसेक्ससाठी फक्त २ सामने खेळला. यादरम्यान त्याने एकूण ४ विकेट्स घेतल्या. यापूर्वी, तो इंडिया अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्धही एक सामना खेळला होता, जिथे खलीलने पहिल्या डावातच ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतरच तो एसेक्स संघात सामील झाला.

खलील अहमदची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

खलील अहमदने आतापर्यंत टीम इंडियासाठी ११ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने एकदिवसीय सामन्यात १५ विकेट्स आणि टी-२० मध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या खलील अहमदने २०१९ मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याच वेळी, त्याने गेल्या वर्षी टी-२० मध्ये पुनरागमन केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---