क्या बात है… Google, Microsoft नंतर Youtubeच्या सीईओपदी भारतीय

नवी दिल्ली : भारतीयांचा डंका संपूर्ण जगात वाजत आहे. भारतीयांकडे असामान्य बुध्दीमत्ता असते, हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अल्फाबेटचे नेतृत्व सध्या सुंदर पिचाई यांच्याकडे आहे. म्हणजे Googleचे सीईओ भारतीय आहेत. सत्या नाडेला हे जगातील सर्वात लोकप्रिय Microsoft चे सीईओ आहेत. आता Youtubeच्या सीईओपदी देखील भारतीय वंशाचे नील मोहन यांची नियुक्ती झाली आहे.

यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओदेखील भारतीय असून, अल्फाबेटचे नेतृत्व सध्या सुंदर पिचाई यांच्याकडे आहे. सुंदर पिचाई यांना २०१५ मध्ये गुगलचे सीईओ बनवण्यात आले होते. त्यानंतर ते २०१९ मध्ये अल्फाबेटचे सीईओ बनले. सत्या नाडेला हे जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत. याआधी ते क्लाउड आणि एंटरप्राइज ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष राहिले आहेत. आयबीएमचे अध्यक्ष आणि सीईओ अरविंद कृष्णा आहेत.

शंतनू नारायण हे दिग्गज आयटी कंपनी Adobe चे सीईओ आहेत. Vimeo च्या सीईओ पदाची जबाबदारी सध्या अंजली सूद यांच्याकडे असून, चॅनेलच्या सीईओ पदाची धुरा लीना नायर यांच्याकडे आहे. स्टारबक्सचे सीईओपदावरदेखील भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन आहेत. राज सुब्रमण्यम हे FedEx चे सीईओ आहेत. निकेश अरोरा हे पालो अल्टोचे सीईओ असून, Netappच्या सीईओ पदावर भारतीय वंशाचे जॉर्ज कुरियन आहेत.