गजानन निमदेव
तरुण भारत लाईव्ह : अयोध्या ही प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी आहे आणि जन्मस्थळी श्रीरामांचे भव्य मंदिर उभे झाले पाहिजे, ही समस्त हिंदू बांधवांची कामना होती. ती कामना लवकरच म्हणजे 2024 च्या जानेवारी महिन्यात पूर्ण होईल, हे आता स्पष्ट दिसते आहे. हिंदू बांधवांनी अर्थात कोट्यवधी रामभक्तांनी दीर्घ काळ दिलेला लढा यशस्वी ठरला आणि आता जन्मभूमीवरच प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर आकार घेत आहे, हे अहोभाग्यच!
अस्वस्थता तर संपली…
प्रकरण न्यायालयात होते आणि न्यायालय त्यावर काहीच निवाडा देत नव्हते, तेव्हा (Indian culture) हिंदू जनमानस अस्वस्थ झाले होते. पण, आता ती सगळी अस्वस्थता संपली आहे. भव्य मंदिराचे 60-65 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट होते, तेव्हा जनभावना तीव्र होत्या. खरे तर या तीव्र जनभावनांची दखल मुस्लिम बांधवांनीच घ्यायला पाहिजे होती. प्रकरण न्यायालयाबाहेरच मिटायला पाहिजे होते. पण, तसे झाले नव्हते. अखेर, न्यायालयानेच ऐतिहासिक निवाडा दिला आणि आज जन्मभूमीवर मंदिर निर्माण वेगाने सुरू आहे. रामभक्तांची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. ज्या गतीने काम सुरू आहे, ते लक्षात घेतले तर जानेवारी-24 मध्ये आपल्याला दर्शन घेता येईल, ही आनंदाची बाब होय.
प्रदीर्घ संयम
अयोध्येत ज्या ठिकाणी आज मंदिर निर्माण होत आहे, तिथे आधीही (Indian culture) श्रीरामाचे मंदिरच होते आणि बाबर नावाच्या आक्रमकाने ते पाडून तिथे मशीद बांधली होती, याचे सगळे पुरावे न्यायालयाला सादर करण्यात आल्यानंतरच रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्याबाबतचा निवाडा न्यायालयाने दिला. निवाड्याची प्रतीक्षा करताना हिंदूंनी गेली कित्येक वर्षे संयम पाळला आहे. त्यामुळे आता कधी एकदा अयोध्येत जाऊन आपल्या रामललाचे दर्शन घेतो, असे रामभक्तांना झाले आहे.
भारतीय संस्कृतीची आंतरिक शक्ती
भारतात विविधता आहे आणि या (Indian culture) विविधतेत सौंदर्यही दडले आहे. विविधता सगळ्यांनीच स्वीकारली आहे आणि त्यावर प्रत्येक भारतीयाला गर्वही आहे. भारताची संस्कृती ही हजारो वर्षे जुनी आहे. अशा या प्राचीन संस्कृतीवर अनेकदा आक्रमणे झालीत. पण, सगळी आक्रमणे परतवून लावत भारतीय प्राचीन परंपरा आजही मजबुतीने टिकून आहे. आपली ही जी प्राचीन संस्कृती आहे, ती संपूर्ण जगाला एक कुटुंब मानणारी आहे. हे भारतीय संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. भारतात अनेक धर्म आहेत, त्या धर्माची मतं आहेत. या सगळ्यांना भारतीय संस्कृतीने मान्यताही दिली आहे. सर्व प्रकारच्या विचारांना मान्यता देऊन भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला सहिष्णुतेचा पुरावाच दिला आहे. ‘शांततापूर्ण सहजीवन’ हे भारतीय संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. या पृष्ठभूमीवर न्यायालयाच्या बाहेर राम मंदिर बांधण्याबाबत सर्वमान्य तोडगा लवकर निघाला असता तर जगासमोर भारताच्या आंतरिक शक्तीचे प्रदर्शन घडले असते आणि त्यातून भारतीय संस्कृती आणखी उजळून निघाली असती.
…तर जगाने आपली क्षमता मान्य केली असती
राम मंदिराच्या मुद्यावर सर्वमान्य तोडगा काढणे तसे कठीण नव्हते. या (Indian culture) देशात हिंदू बहुसं‘य आहेत आणि अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत जन्मभूमीवरील दावा सोडायला पाहिजे होता. त्या बदल्यात त्यांना मशिदीसाठी सर्व प्रकारची मदत हिंदू बांधवांनी केली असती, यात शंका नव्हती. आपले हित कशात आहे, हे मुस्लिम बांधवांनी लक्षात घ्यायला हवे होते. या मुद्यावर सकारात्मक सर्वमान्य तोडगा काढण्यात आपल्याला यश आले असते तर अनेक जागतिक समस्यांवर तोडगा काढण्याची आपली क्षमताही मान्य केली गेली असती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमाही अधिक उजळून निघाली असती, हे निर्विवाद.
मुद्दा प्रयत्नपूर्वक राजकारणाशी जोडला गेला
विविध धर्म, प्रांत, भाषा असूनही (Indian culture) भारतात सगळे लोक हजारो वर्षांपासून सामंजस्याने राहतात, हे सत्य जगाने आधीच स्वीकारले आहे. त्यामुळे राम मंदिरासारख्या मुद्यावर सर्वमान्य तोडगा शांततामय मार्गाने निघाला असता आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले गेले असते तर जगभर भारतीय ऐक्याचा आणखी मजबूत संदेश गेला असता, याचा विचारच कुणी कधी केला नव्हता. भारतीय जनता पार्टीने राम मंदिराचा मुद्दा जेव्हा जेव्हा उपस्थित केला, तेव्हा प्रत्येक वेळी तो राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला. मुस्लिम बांधवांच्या मनात हिंदूंबाबत भय निर्माण करून देशात एक अस्थिर वातावरण तयार केले गेले आणि मंदिराच्या मुद्यावर सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले गेले, हे तमाम देशवासीयांना माहिती आहे.
मार्गदर्शकाची भूमिका निभावण्याची क्षमता
जगात सगळीकडेच सध्या अस्थिर वातावरण आहे आणि या (Indian culture) अस्थिरतेचा फटका मनुष्यमात्राला बसतो आहे. अशा परिस्थितीत जगाचा मार्गदर्शक म्हणून भूमिका घेण्याचा अधिकार भारताला प्राप्त होऊ शकतो आणि त्यातून जागतिक शांततेचा मार्गही मोकळा होऊ शकतो. भारताची वाटचाल ही विश्वगुरू होण्याकडे सुरू आहे. जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करण्याचे सर्वंकष प्रयत्न आपण करतो आहोत. गेल्या आठ-नऊ वर्षांत भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, जपान यांसारखे प्रगत देश आज भारताकडे एक जागतिक शक्ती म्हणूनच पाहात आहेत. कोरोना संकटाच्या काळात आपण आपल्या शक्तीची चुणूक जगाला दाखवलीच आहे. आजही तुर्की आणि सीरियात भूकंप आला असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण आपली मदतपथके आणि जीवनावश्यक साहित्य पाठविलेच आहे. अनेकांचे प्राण वाचवण्यात भारतीय मदतपथकाला यशही आले आहे. वास्तविक, तुर्कीने आपल्याशी जाणीवपूर्वक वैर पत्करले होते. आपल्याला प्रचंड त्रासही दिला. पण, ते सगळे विसरून आपण संकटात धावून गेलो, हा आपल्या संस्कृतीचाच प्रभाव आहे. रशिया आणि युक‘ेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भारतच मार्ग काढू शकतो, हा जो आशावाद अनेक देशांनी व्यक्त केला आहे, तोही भारतीय संस्कृतीचाच प्रभाव मानला पाहिजे.
शांततामय मार्गाने सहजीवन जगणे क‘मप्राप्त
विज्ञान आणि तंत्रज्ञानात अफाट प्रगती झाली आहे. (Indian culture) संपूर्ण जग जवळ आले आहे, असे म्हटले जात असताना माणसं एकमेकांपासून का दूर जात आहेत आणि हिंसेचा मार्ग का अवलंबत आहेत, ही बाब चिंता वाढवणारी आहे. संपूर्ण जगातच लोकसं‘या वाढत आहे, गरिबी वाढत आहे, हिंसाचार वाढत आहे, दहशतवाद फोफावत आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. रशियाने तर युक्रेनविरुद्ध युद्ध छेडलेच आहे आणि त्यात आतापर्यंत प्रचंड प्राण व वित्तहानी झाली आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता आज जगातील प्रत्येक मोठ्या आणि प्रगत देशात विविध धर्म, पंथ, भाषेच्या लोकांना गुण्यागोविंदाने शांततामय मार्गाने सहजीवन जगणे क्रमप्राप्त झाले आहे. बाहेरून आलेल्यांना सहज स्वीकारणे ही सोपी गोष्ट नाही. पण, जे मूळ निवासी आहेत, त्यांना अशी स्वीकारार्हता दाखवावीच लागणार आहे. ही काळाची गरज आहे. आज युरोपातल्या अनेक प्रगत देशांमध्ये जे मुस्लिम स्थलांतरित आले आहेत, त्यांच्यामुळे अनेक देशांमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. पण, अशा घटना घडू नयेत यासाठी मूळ निवासी नागरिकांना पुढाकार घेऊन समस्येवर तोडगा काढावा लागणार आहे.
महात्मा गांधींनी केले होते सारगर्भित वर्णन
(Indian culture) भारताने वैचारिक स्तरावर विविधतेचा जो स्वीकार केला, त्यासदंर्भात महात्मा गांधी असे म्हणाले होते की, माझे घर हे चारही बाजूंनी भिंतींनी घेरलेले असावे आणि त्याला असलेली दारे-खिडक्या बंद असावीत, असे मला अजिबात आवडणार नाही. पण, मला असे वाटते की, माझ्या घराच्या आसपास देशी-विदेशी संस्कृतीचे वारे वाहिले पाहिजे, मात्र त्या वार्यांमुळे माझे जमिनीवर असलेले पायही घट्टच राहिले पाहिजेत. ते उखडले जाऊन मी तोंडावर आपटायला नको. माझा धर्म हा संकुचित आणि अनुदार निश्चितच नाही. महात्मा गांधींनी अतिशय सारगर्भित असे वर्णन केले होते. आज जगातील जे देश विविधतेत एकता स्वीकारू शकत नाहीत, त्यांनी महात्मा गांधींचे हे सारगर्भित वर्णन जरूर अंगीकारले पाहिजे.
त्याकाळी महात्मा गांधी यांनी जे विचार व्यक्त केले होते, ते (Indian culture) संपूर्ण जगाने अंमलात आणण्याची आवश्यकता असताना त्या विपरीत घडत आहे. सगळे धर्म दुसर्या धर्माला आपल्या बरोबरीचे आणि योग्य मानत नाही. भेदभाव केला जात आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण आहे. हिंसाचार बोकाळला आहे. दहशतवाद फोफावला आहे. लोकांमध्ये अविश्वास आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक धर्माने दुसर्या धर्माला योग्य मानले, समकक्ष मानले, त्या धर्माच्या भावभावनांचा आदर केला तर आज सीमांच्या सुरक्षेसाठी आणि शस्त्रास्त्र खरेदीसाठी जो अवाढव्य खर्च केला जात आहे तो करावा लागणार नाही, शिवाय शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जो तणाव निर्माण झाला आहे, तो नष्ट होऊन शांतताही प्रस्थापित होऊ शकेल.
…शांततेच्या दिशेने पडू शकते मोठे पाऊल
ईश्वरापर्यंत जाण्याचा सगळ्यांचा मार्ग एकच आहे, फक्त जीवन जगण्याची प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे, हे जरी मान्य केले तरी जागतिक शांततेच्या दिशेने मोठे पाऊल पडू शकते. (Indian culture) शिवाय, सैन्यशक्ती आणि शस्त्रास्त्रे यावर जो अवाढव्य आणि अनावश्यक खर्च होत आहे, तो खर्च वाचेल, त्या पैशातून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढीस लागेल आणि सरतेशेवटी संपूर्ण जगातील दारिद्र्य दूर करण्यास मदत होईल, हे लक्षात घेतल्यास फार मोठे काम फत्ते होईल. आज जगात कोट्यवधी लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत, कोट्यवधी लोकांना आरोग्याच्या सोईसुविधा उपलब्ध नाहीत, असुरक्षिततेची भावना मनात घर करून आहे. जगाने प्राचीन भारतीय संस्कृती समजूनच घेतलेली नाही. ज्या भारतीय संस्कृतीत विश्वबंधुत्वाची कल्पना सांगितली आहे, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही धारणा आहे, त्या भारतीय संस्कृतीला समजून घेण्यात जागतिक समुदाय कमी पडतो आहे, हेच शेवटी खरे!
आपली संस्कृती अधिकच समग्र झाली
कोणतीही संस्कृती असो, सभ्यता असो, भाषा असो, विज्ञान असो, (Indian culture) गतिशीलता हे प्रत्येकाचे आवश्यक असे अंग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कालौघात जे परिवर्तन स्वीकारणे आवश्यक होते, ते भारतीयांनी स्वीकारल्याने आधीच प्रगल्भ असलेली आपली संस्कृती अधिकच समग्र झाली, हे मान्य करावे लागेल. जो मार्ग भारताने अवलंबला तो जगातल्या इतर देशांनी आणि धर्मांनीही अवलंबला तर आज जी प्रचंड उलथापालथ होताना दिसते आहे, ते कमी कमी होत जाऊन शांतता प्रस्थापित होईल, हे निश्चित! भारतीय संस्कृतीचे भांडार जगात सर्वात श्रीमंत असे आहे. संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीच्या समृद्ध भांडाराएवढे भांडार अन्य कुठल्याही संस्कृतीचे नाही, असे महात्मा गांधी यांनी फार पूर्वी म्हटले होते, ते खरेच आहे.
संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणार्या (Indian culture) भारतात आज शांतता, सद्भाव अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे. मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांबाबतचे भय मनातून काढून टाकले पाहिजे. मतपेटीच्या संकुचित स्वार्थी राजकारणासाठी ज्या राजकीय पक्षांनी मुस्लिमांच्या मनात भय निर्माण केले आहे, त्या राजकीय पक्षांना धडा शिकवला पाहिजे. न्यायालयीन खटला तर मार्गी लागला आहे. आता जन्मभूमीवर प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर बांधण्यास सहकार्य केले तर आज राष्ट्रीय ऊर्जेचा जो अपव्यय होत आहे तो थांबेल आणि संपूर्ण जगात एकतेचा संदेश जाऊन मानव कल्याणाच्या दिशेने पुढचे पाऊल पडेल, याची खात्री बाळगली पाहिजे.