सर्वात मोठी संधी..! बारावी पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलात मेगाभरती सुरु

भारतीय नौदलाने अग्निवीर भरती 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार अग्निवीरच्या अधिकृत वेबसाइट agniveernavy.cdac.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतीय नौदलातील या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी आज म्हणजेच २९ मे पासून सुरू होईल आणि १५ जून २०२३ पर्यंत चालेल.

नौदलाच्या या भरती मोहिमेत अग्निवीरच्या एकूण 1365 पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना संपूर्ण भरती अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो. पुढील पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर संक्षिप्त तपशील वाचता येतील.

अर्ज पात्रता:
भारतीय नौदलातील अग्निवीर भरतीसाठी, उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून गणित आणि भौतिकशास्त्रासह 10+2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच बारावीच्या परीक्षेत रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा संगणकशास्त्र यापैकी कोणताही एक विषय असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवारांचा जन्म 1 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान झालेला असावा.

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. पहिल्या टप्प्यात, उमेदवारांना ऑनलाइन CBT परीक्षेद्वारे निवडले जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. संगणक आधारित चाचणीमध्ये 100 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्न 01 गुणांचा असेल.

अर्ज शुल्क:
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 550 रुपये जमा करावे लागतील. यासोबतच 18 टक्के जीएसटीही भरावा लागणार आहे. नेट बँकिंग, UPI पेमेंट किंवा डेबिट/एटीएम कार्ड यांसारख्या सर्व प्रकारच्या पेमेंटवर GST लावला जाईल.

ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्रे फक्त अशा उमेदवारांना दिली जातील ज्यांनी यशस्वीरित्या अर्ज शुल्क जमा केले आहे.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा