दहावी ते पदवीधर उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. भारतीय नौदलाने विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. एकूण 741 रिक्त पदांवर ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी त्वरित अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 20 जुलै 2024 पासून सुरू केली जाईल, जी 2 ऑगस्ट 2024 च्या नियोजित अंतिम तारखेपर्यंत सुरू राहील. यांनतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीय. पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in ला भेट देऊन या तारखांच्या दरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
1) चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) 01
2) चार्जमन (फॅक्टरी) 10
3) चार्जमन (मेकॅनिक) 18
4) सायंटिफिक असिस्टंट 04
5) ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) 02
6) फायरमन 444
7) फायर इंजिन ड्राइव्हर 58
8) ट्रेड्समन मेट 161
9) पेस्ट कंट्रोल वर्कर 18
10) कुक 09
11) मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) 16
पात्रता काय?
उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील ITI/डिप्लोमा/अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी इ.सह 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि पदानुसार कमाल वय 25/27/30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल.
तुम्हाला किती पगार मिळेल ?
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) – 35,400/- ते 1,12,400/-
चार्जमन (फॅक्टरी) -35,400/- ते 1,12,400/-
चार्जमन (मेकॅनिक) -35,400/- ते 1,12,400/-
सायंटिफिक असिस्टंट -35,400/- ते 1,12,400/-
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) – 25,500/- ते 81,100/-
फायरमन – 19,900/- ते 63,200/-
फायर इंजिन ड्राइव्हर – 21,700/- ते 69,100/-
ट्रेड्समन मेट – 18,000/- ते 56,900/-
पेस्ट कंट्रोल वर्कर -18,000/- ते 56,900/-
कुक – 19,900/- ते 63,200/-
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) -18,000/- ते 56,900/-
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा