भारतीय नौदल : थेट इंटरव्ह्यूमधून होणार भरती

तरुण भारत लाईव्ह । २३ जानेवारी २०२३। भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न जे पाहत आहे त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नसून थेट इंटरव्ह्यूमधूनच उमेदवार निवडले जाणार आहेत. भारतीय नौदलात काही पदांसाठी ही भरती केली जाणार असून या पदासाठी अर्ज कसा करावा या बदल जाणून घेऊया.

भारतीय नौदलात एसएससी एग्झीकिटिव्ह या पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवाराला MSC/B-TECH/ BCA/ MCA/ BSC  ही पदवी किमान ६० टक्क्यांनी पास असणे गरजेचे आहे. एनसीसीच्या उमेदवारांना कट ऑफ मध्ये ५ टक्के सूट देण्यात येणार आहे.

उमेदवाराला joinindiannavy.gov.in या वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग उमेदवाराला  त्याच्या पदवीच्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट करून त्याला एसएसबी इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल. एकूण ७० पदांसाठी ही भरती होणार असून उमेदवाराला २१ जानेवारी २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येईल.