10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे तब्बल 44 हजारापेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहे.
विशेष म्हणजेच या भरतीसाठी कुठेलीही परीक्षा देण्याची गरज नाहीय. उमेदवारांची निवड इयत्ता 10 वी मध्ये मिळालेल्या गुणवत्तेच्या गुणांच्या आधारे केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. भरतीद्वारे, शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक म्हणून रिक्त पदे भरली जातील. भारतातील अनेक राज्यांमध्ये या रिक्त पदांसाठी भरती होत आहे. सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवारांची निवड इयत्ता 10 वी मध्ये मिळालेल्या गुणवत्तेच्या गुणांच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.
तुम्हाला किती पगार मिळेल?
पोस्ट ऑफिस GDS, ABPM आणि GDS पोस्टचा पगार 10,000 रुपये ते 24470 रुपये प्रति महिना असतो. तर बीपीएम पदाचा पगार 12 हजार ते 29,380 रुपयांपर्यंत आहे.
असा करा अर्ज:
www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
यानंतर, अर्जदारांना प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करण्यासाठी, अर्जदारांकडे त्यांचा सक्रिय ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
आता तुम्ही नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने अर्जामध्ये प्रवेश करू शकता.
अर्ज भरण्यास सुरुवात करा.
विनंती केलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
आता अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा