भारतीय जवानांना शत्रू देशाच्या कंपन्यांचे मोबाइल फोन वापरावर बंदी!

 

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने देशभरात तैनात असलेल्या भारतीय जवानांना शत्रू देशाच्या कंपन्यांचे  (चिनी )मोबाइल फोन वापरण्यास बंदी घातली आहे. नवी दिल्लीतील आर्मी  मुख्यालयातील सैन्य  गुप्तचर अधिकाऱ्यांनी देशभरात तैनात असलेल्या सैनिकांना, अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की,  राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने11 ब्रँडचे चायनीज मोबाइल फोन वापरण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला आहे. डायरेक्टर जनरल मिलिटरी इंटेलिजन्सने फॉर्मेशन आणि युनिट कमांडर्सना चिनी मोबाईल फोन वापरण्याच्या धोक्यांबद्दल सैन्यांना संवेदनशील करण्याचे निर्देश दिले आहेत.

चिनी मोबाइल मध्ये या कंपन्यांचा असेल समावेश 

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शत्रू देशाच्या कंपन्यांचे मोबाइल फोन खरेदी करणे किंवा वापरणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सैनिकांच्या  Indian soldier मुख्यालयाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये  यादीत चिनी कंपन्यांच्या Vivo, Oppo, Honor, Xiaomi, One Plus, Realme, ZTE, Meizu, Gionee, Infinix आणि Asus यांच्या मोबाईल फोनचा समावेश आहे. ज्या जवानांकडे या कंपन्यांचे मोबाईल फोन आहेत त्यांनी ३० मार्चपर्यंत ते बदलून घ्यावेत, असेही अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. लष्करी गुप्तचर अधिकार्‍यांनी फॉर्मेशन आणि युनिट कमांडर्सना चिनी मोबाईल फोन वापरण्याच्या धोक्यांबद्दल सैन्याला संवेदनशील करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या संदर्भातील पूर्णत्वाचा अहवाल ३० मार्चपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सैनिकांनी 11 ब्रँडचे चिनी फोन वापरू नयेत यासाठी पूर्वी खबरदारीचे उपाय करणे ही आर्मीची अंतर्गत बाब आहे.