मोठी बातमी! वन डे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; या दोघांना डच्चू

नवी दिल्ली : भारतात ५ ऑक्टोबरपासून वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून संघात तीन बदल करण्यात आले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी स्पर्धेसाठी संघ जाहीर केला.

सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ तारखेला आमनेसामने असतील. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय संघात अक्षर पटेलची एन्ट्री झाली असून यजुवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांना वगळण्यात आले आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करत असलेल्या लोकेश राहुल आणि श्रेयस यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे.

वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

विश्वचषकातील भारताचे सामने :
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका – २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स – १२ नोव्हेंबर, बंगळुरू