IND vs PAK : महत्वपूर्ण सामन्यात भारताची खराब सुरवात; आयपीएल लिलावातील चर्चेतील ‘हा’ खेडाळुही अपयशी

#image_title

India vs Pakistan U19 Aisa Cup: वैभव सुर्यवंशी हा आयपीएल लिलावातील प्रचंड चर्चेचा विषय राहिलेला आणि आयपीएलमध्ये पदापर्ण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. १ ३ वर्षीय वैभव सुर्यवंशी ला राजस्थान रॉयल्स संघाने १ कोटी १० लाख रूपयांत करारबद्ध केले आहे. वैभवची १९ वर्षांखालील आशिया कप संघात देखील निवड झाली. पण, पाकिस्तानविरुद्धच्या महत्पूर्ण सामन्यात तो अपयशी ठरला आहे.

पहिल्या इनिंगमध्ये पाकिस्तान संघाने भारतापुढे विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 281 धावा केल्या होत्या . पाकिस्तानसाठी शाहझेब खान याने सर्वाधिक 147 धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरात उतरलेल्या भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. चौथ्या षटकात १७ वर्षीय मुंबईकर आयुष म्हात्रे अवघ्या २० धावा करून तंबूत परतला. तर, वैभव सुर्यवंशीला अवघी एक धाव करता आली. हाती आलेल्या शेवटच्या वृत्तानुसार १८व्या षटकानंतर भारताने ७१ धावांवर ३ विकेट्स गमावले आहेत..

वैभव सूर्यवंशी हा 13 वर्षीय आयपीएल मेगा ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला. तसेच वैभवने आयपीएलमधील सर्वात युवा कोट्यधीश खेळाडू होण्याचा बहुमानही मिळवला. वैभवची बेस प्राईज ही 30 लाख रुपये इतकी होती. मात्र राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाख रुपये मोजत आपल्या ताफ्यात घेतले आहे.