इस्त्रायलची शक्तिशाली ‘स्पाईक’ मिसाईल’ ने वाढणार भारताची ताकद; चीन, पाकिस्तानला धडकी

नवी दिल्ली : इस्रायलने तयार केलेली स्पाईक-NLOS मिसाईल आता भारताला मिळणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमध्ये ही मिसाईल असणार आहे. भरपूर उंचावर असणारे शत्रूचे टँक आणि इतर वाहनांना टार्गेट करण्यासाठी या मिसाईलचा वापर होईल. या क्षेपणास्त्राला चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

ही एक गाईडेड मिसाईल आहे. म्हणजे एकदा टार्गेट फिक्स झालं की त्याने कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरीही ही त्याचा वेध घेते. केवळ टँकच नाही, तर शत्रूच्या हेलिकॉप्टरचा वेध घेण्याची क्षमताही यामध्ये आहे. ही मिसाईल खांद्यावर ठेऊन किंवा ट्रायपॉड-बायपॉड अशा स्टँडवर ठेऊनही डागली जाऊ शकते. हेलिकॉप्टर, टँक अशा वाहनांमध्येही ही मिसाईल घेऊन जाऊ शकतो. इस्राईलसोबतच जगातील ३५ देशांकडे ही मिसाईल आहे.

भारतीय सैन्याकडे पूर्वीपासूनच एक स्पाईक मिसाईल आहे. मात्र, ही मिसाईल सैनिक आपल्या खांद्यावरुन लाँच करत होते. आता या क्षेपणास्त्राचं एअर-फोर्स व्हर्जन भारताकडे आलं आहे. यामुळे हेलिकॉप्टरवरुन हे क्षेपणास्त्र लाँच करता येणार आहे. भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये ६०० ते २५ हजार मीटर रेंज असणारी स्पाईक मिसाईल बसवण्यात येणार आहे. या मिसाईलमध्ये इन्फ्रारेड सेन्सरही असतो. त्यामुळे अंधारातही शत्रूच्या वाहनांचा वेध घेण्याची क्षमता यात आहे.