भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे. व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअर्सने झपाट्याने उसळी घेतली. 6 महिन्यांनंतर प्रथमच कंपनीच्या शेअर्समध्ये एवढी मोठी वाढ दिसून आली आहे.
शुक्रवारी RIL च्या शेअर्सने BSE वर 4.5 टक्क्यांनी उसळी घेतली. काल शेअर 1,266.45 रुपयांवर बंद झाला होता, तर आज 1,325.10 रुपयांवर उघडला. त्यामुळे मार्केट कॅप 17,95,583.99 कोटींवर पोहोचले. याचा अर्थ, अवघ्या एका दिवसात मुकेश अंबानींना तब्बल 76,425 कोटींचा नफा झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजने ऑक्टोबर-डिसेंबर 2024 तिमाहीत नफा आणि महसुलात भरीव वाढ नोंदवली. निव्वळ नफ्यात 7.4 टक्क्यांची वाढ झाली असून, महसूल 7 टक्क्यांनी वाढला आहे.
- Jio Infocomm : नफा 24% वाढून कंपनीला आर्थिक मजबूती दिली.
- रिलायन्स रिटेल व्हेंचर्स : तिसऱ्या तिमाहीत 3,458 कोटी रुपयांचा नफा झाला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी अधिक आहे.
ब्रोकरेज हाऊसचा खरेदीचा सल्ला
त्रैमासिक निकालानंतर गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. प्रमुख ब्रोकरेज हाऊसने RIL च्या शेअर्सवर खरेदीचा सल्ला दिला आहे:
- मिरे ॲसेट शेअरखान: 1,827 रुपयांचे लक्ष्य.
- मोतीलाल ओसवाल: 1,600 रुपयांचे लक्ष्य.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या वाढत्या कामगिरीमुळे मुकेश अंबानी यांची आर्थिक स्थैर्य आणखी बळकट झाली आहे.