मुंबई : टीम इंडियासोबत भिडण्यासाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्ध कसोटी आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया आणि चाहत्यांना ऑलराउंडर रवींद्र जाडेजा, यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह कधी परतणार याची उत्सूकता लागून राहिली आहे. या दोघांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर., दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली., तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा., चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद मध्ये होणार आहे.
क्रिकेबझच्या रिपोर्टनुसार, एनसीएच्या मेडिकल टीमने जाडेजाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. जाडेजा नागपुरात टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये दाखल होईल. जाडेजानं नुकतंच रणजी ट्रॉफी स्पर्धेत सौराष्ट्रकडून खेळताना 7 विकेट्स घेतल्या होत्या.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला लवकरच फिटनेस सर्टिफिकेट मिळणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बुमराहने एनसीएत बॉलिंगला सुरुवात केली आहे. या सरावदरम्यान बुमराहला काही त्रास झाला नाही, तर तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असू शकतो.