---Advertisement---

Bhadgaon News : जखमी बिबट्याच्या पिल्लाला मिळाले जीवदान

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यातील भडगाव-एरंडोल रस्त्यावर भडगाव नजीक रस्ता ओलांडताना एका बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी तात्काळ या घटनेबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.

वनपाल नंदू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पिल्लाला प्रथमोपचार दिले. पुढील उपचारांसाठी नाशिक येथे पाठवले आहे. विशेषतः वेळीच मदत मिळाल्याने बिबट्याच्या पिल्लाला जीवदान मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले हे भडगाव-एरंडोल रस्त्यावर जात होते. दरम्यान, त्यांना भडगाव नजीक रस्ता ओलांडताना एका बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ या घटनेबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.

वनपाल नंदू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पिल्लाला प्रथमोपचार दिले. पुढील उपचारांसाठी नाशिक येथे पाठवले आहे. विशेषतः वेळीच मदत मिळाल्याने बिबट्याच्या पिल्लाला जीवदान मिळाले आहे.

दरम्यान, हे बिबट्या पिल्ल अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालं असावं असा अंदाज व्यक्त होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले व वनविभाग यांच्या तत्परतेने अखेर बिबट्याच्या पिल्लाला जीवदान मिळाले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment