राष्ट्रवादीला दणका! पक्षाचं ‘घड्याळ’ हे पक्षचिन्ह जाणार?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘राष्ट्रीय पक्ष’ हा दर्जा रद्द झाल्यामुळे यावर्षी या पक्षाला महाराष्ट्राबाहेर ‘घड्याळ’ हे पक्षचिन्ह निवडणुकीत वापरायचे असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर घड्याळ चिन्ह द्यायचे की नाही? याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या श्रीकांत देशपांडे यांचा राज्य दौरा सुरु असुन आतापर्यंत विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, पालघर जिल्ह्यांतील दौरा पुर्ण झाला आहे. राज्य पातळीवरील पक्षांना संबंधित राज्याबाहेरही त्यांचे चिन्ह हवे असेल तर त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. असं देशपांडे यांनी सांगितलं. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय भुमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.