झटपट मलई मोदक रेसिपी

तरुण भारत  लाईव्ह । ९ एप्रिल २०२३। आज संकष्टी चतुर्थीला बाप्पा ला नैवैद्य मोदकाचा दाखवला जातो. यंदा घरच्या घरी वेगळ्या प्रकारचे मोदक बनवण्याचा विचार करताय? तर तुम्ही झटपट मलई मोदक बनवू शकतात. झटपट मलई मोदक घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
२५० ग्रॅम पनीर, १२५ ग्रॅम पिठी साखर, पाव चमचा वेलची पूड.

कृती 
सर्वप्रथम, पनीर किसून घेऊन ते हाताने छान मळून घ्या. कमीत कमी दहा मिनिटं तरी मळून घ्या. एकजीव करून घेतलेल्या पनीरमध्ये पिठीसाखर घाला. हे मिश्रण तव्यामध्ये घालून अगदी मंद आचेवर पाच ते सात मिनिटं परतून घ्या. मिश्रणाला पाणी अजिबात सुटता कामा नये. नंतर वेलची पूड घालून मिक्स करून घ्या. आता मोदक साच्यामध्ये घालून मोदक वळून घ्या.