तरुण भारत लाईव्ह । १६ मार्च २०२३। संध्याकाळच्या वेळेला भूक लागते. अशावेळी काही वेगळं खावंसं वाटतं. पण वेगळं काय खावं हा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही पोह्यांपासून बनवले जाणारे दडपे पोहे बनवू शकता. अगदी १० मि तयार होणारे दडपे पोहे तुम्ही घरी ट्राय करू शकता. दडपे पोहे घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
मध्यम पोहे, नारळ, कांदे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर तेल, मोहरी, हिंग
कृती
सर्वप्रथम नारळ खवून ठेवा कांदा बारीक चिरा पोह्यांवर थोडे पाणी संपून दहा मिनिटे तसेच ठेवा नंतर ते फुगतात एक एका रुंद तोंडाच्या भांड्यात पहिला पोह्यांचा थर लावा पोह्यांवर चिडलेला कांदा पसरून घाला त्यावर ओले खोबरे कीस व मिरच्यांचे तुकडे घाला असे साधारण एकावर एक असे दोन थर लावा वर झाकण झाला झाकणावर वजन ठेवून पोहे धडकून ठेवा दहा ते पंधरा मिनिटांनी झाकण काढा अलगटपणे पोहे मिश्रण कालवा त्यात मीठ साखर घाला लिंबू रस पिळा चिरलेली कोथिंबीर टाका हिंग व मोहरी घालून तेलाची खमंग फोडणी करून दडपे पोहे सर्व्ह करा.