Integrated Textbook Scheme : शाळा सुरू झाली आणि पालक विद्यार्थ्यांचे लगबग सुरू झाली. स्टेशनरी दुकानावर गर्दीच गर्दी… एवढ सर्व साहित्य घेताना खिशाला का तिथे बसतेस पण एवढं शाळेत माझा पालक कसा घेऊन जाईल याची चिंता ही पालकांना सतावत असते.
दिवसेंदिवस विद्यार्थ्यांकडे बघत असताना सकाळपासून खांद्यावर लटकवलेली बॅग संध्याकाळी रात्री होईपर्यंत काही केल्या सुटत नाही. असे नेहमी निदर्शनास येते.शाळा झाली की ट्युशन आणि ती फक्त एक नाही तर दोन-तीन असतातच. विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक, वह्या तसेच जेवणाचा डबा, पाण्याची बाटली इत्यादी साहित्य दप्तरांमध्ये घेऊन जावे लागते. शालेयस्तरावरील विद्यार्थी हा फक्त ज्ञान संपन्न असून चालणार नाही.तर तो शारीरिक दृष्ट्या सुद्धा सुदृढ असणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे दप्तर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाठ दुखी, मानदुखी, डोकेदुखी,मानसिक तान असे अनेक आजार निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.हे सर्व टाळण्यासाठी विविध उपाय योजना – सूचनांची अंमलबजावणी शासन स्तरावरून प्रभावीपणे करण्यात येत आहे. यातलाच एक भाग म्हणजे शासन निर्णय दिनांक २१ जुलै २०१५ काढण्यात आला. शासन निर्णय २१ जुलै २०१५ नुसार विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीबरोबरच निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करून आनंदी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यात आले व त्याविषयी आवश्यक त्या सूचना शाळांना देण्यात आल्या व या सूचना राज्यांतर्गत सर्व मंडळाच्या शाळांना लागू राहतील असे सुचित करण्यात आले.
२०१५ पासून दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी प्रयत्न सतत चालू आहेत. तरी पाहिजे तसा बदल दिसून येत नाही. तासिका बसवतांना पुस्तकांची संख्या काही करता कमी करता येत नव्हती. दिवसाला विषय कमी ठेवल्यास अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण जाईल. पुस्तके तर नावेच लागणार आहेत पण त्यासोबत वही घेऊन जाणे महत्त्वाचे आहे.यामुळे दप्तराचे ओझे हे काही करता कमी करता येत नव्हते. या सर्व बाबींचा विचार करून पाठयपुस्तक मंडळांनेही यापूर्वी सर्व विषयांचे असे एकत्रित करून तीन भागांमध्ये सर्व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिलेली होती. पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबत तज्ञांकडून सकारात्मक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. पाठ्यपुस्तकांचे वह्याच्या पृष्ठासह चार भागात विभाजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना एकावेळी एकच भाग सोबत न्यावा लागणार आहे. वर्गकार्यादरम्यान विद्यार्थी ‘माझी नोंद’ या सदराखाली असलेल्या या वह्याच्या पृष्ठावर आवश्यक नोंदी घेतील,अशी अपेक्षा आहे.शिक्षकांनी या नोंदी विद्यार्थी योग्य प्रकारे घेत आहे याबाबत जाणीवपूर्वक लक्ष द्यावे हे सूचित करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांचे चार भाग तयार करण्यात आलेले आहेत.हे चार भाग स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांना वार्षिक वेळापत्रकानुसार एक-एक करून स्वतंत्रपणे शाळेत सोबत घेऊन जाता येणार आहेत. त्यामुळे निश्चितच दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
या सर्व बाबीत विद्यार्थी व पालक यांचा संभ्रम निर्माण झाला आहे. की पुस्तक बदलले म्हणजे अभ्यासक्रमही बदलला आहे. यामुळे पालक वारंवार याविषयी विचारणा व चर्चा करताना आपल्याला दिसतात.पुस्तकाच्या बाह्य स्वरूपात जरी बदल झाला असला,तरी सर्व विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आशयाच्या संदर्भात कोणताही बदल झालेला नाही. पाठ्यक्रमावर आधारित भाग जसेचा तसा ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी संभ्रमात राहण्याची आवश्यकता नाही.कारण, पुस्तकांच्या फक्त बाह्य स्वरूपात बदल झाला आहे. पुस्तकातील आशय बदललेला नाही हे लक्षात घ्यावे.
एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या पाठ्यपुस्तकांमध्ये सर्व विषयाचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी आवश्यक अशा सर्व आशयाचा समावेश आहे.आशय निश्चिती करून या पाठ्यपुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.शासनाच्या या अभिनव अशा पथदर्शी प्रकल्पाचे आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या प्रयत्नाचे आपण सर्वांनी निश्चितच स्वागत करावे. या बाह्य स्वरूप बदलेल्या पाठपुस्तकांच्या अध्ययन – अध्यापनासाठी शिक्षक-विद्यार्थी-पालक यांना हार्दिक शुभेच्छा.
मनोज भालेराव. (शिक्षक), जळगाव
मो. 8983635561