मोठी बातमी; व्याजदर आणखी वाढणार!

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण धोरण समितीची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. नवीन आर्थिक वर्षाचा हा पहिला द्वि-मासिक आर्थिक आढावा असेल. यामध्ये मुख्य पॉलिसी रेट रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ होऊ शकते. परंतु, २०२३-२४ च्या तिसर्‍या तिमाहीच्या शेवटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे व्याजदर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण धोरण समितीची बैठक ३ ते ६ एप्रिल दरम्यान होणार आहे. या बैठकीतील निर्णयांची घोषणा ६ एप्रिल रोजी जाहीर होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरबीआयच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी अर्थतज्ज्ञांची भेट घेतली ज्यांनी रिझर्व्ह बँकेला दरांमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याची सूचना केली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मे २०२२ पासून पॉलिसी रेट रेपो २.५ टक्क्यांनी वाढवला आहे.

कधी होऊ शकते कपात?
२०२३-२४ च्या तिसर्‍या तिमाहीत जेव्हा स्थिती स्पष्ट होईल आणि महागाईचा दर घसरून ५-५.३० टक्क्यांवर येईल तेव्हा रिझर्व्ह बँक ०.२५ टक्क्यांची कपात करू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.