लॉजमध्ये अश्लील चाळे; आंतरधर्मीय प्रेमी युगुल पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव : पाचोरा पोलिसांनी एका लॉजवर धाड टाकत अश्लील चाळे करताना प्रेमी युगुलला ताब्यात घेतले. या प्रकरणी लॉज चालक-मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोऱ्यातील एका नामांकित लॉजवर एक आंतरधर्मीय प्रेमी युगुल अश्लील चाळे करीत असल्याची खबर पाचोरा पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पोउनि. योगेश गणंगे, पोहेकॉ. विश्वास देशमुख यांच्या पथकाने लॉजवर बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास धाड टाकली. या प्रकरणी लॉज चालक-मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्न करेल… आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून बोदवड तालुक्यातील २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते मे २०२५ या दरम्यान जळगावातील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी गौरव मुकुंद साठे (रा. बोदवड) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले.

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीशी गौरव साठे याची ओळख झाली. त्याने तरुणीला जळगावातील एका हॉटेलमध्ये आणून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. तरुणीने रामानंद नगर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---