State Budget 2024 updates : महायुती सरकारचे अंतरिम बजेट आज; काही तासात…

राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प आज शुक्रवारी सादर होत आहे. महायुती सरकारचे अंतरिम बजेट अगदी काही तासांत समोर येईल. पावसाळी अधिवेशनात सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय घोषणांचा पाऊस पाडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ रोजी पासून सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणारे हे पावसाळी अधिवेशन गदारोळाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने विरोधक उत्साहात आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात लोकाभिमुख घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे.

अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षण, अल्पसंख्याक कल्याण आणि शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पेपरफुटी, ओबीसी आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष महाविकास आघाडी ही सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या फेब्रुवारीत अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांना खूश करणारा निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर करतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेषत: सर्व जाती आणि अल्पसंख्याकांसाठी चांगली बातमी येण्याची चिन्हे आहेत.