---Advertisement---

Dhule Crime News : आंतरराज्यीय टोळीतील गुन्हेगार धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

---Advertisement---

धुळेः आंतरराज्यील टोळीतील स्थानिक गुन्हेगाराला चोरीच्या चारचाकीसह धुळे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेय. आरोपीने संगम नेर शहरातून चारचाकी चोरल्याची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अजय प्रताप कटवाल उर्फ नेपाळ (पुरुषोत्तम कॉलनी, रसराज हॉटेलमागे, नगावबारी, देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

धुळ्यातील पांझरा नदीकिनारी चोरीच्या चारचाकीसह संशयीत आल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला याबाबत कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर शुक्रवार, २१ रोजी पथकाने कारवाई करीत तीन लाख रुपये किंम तीची चारचाकी (बनावट क्रमांक एम.एच.०५ बी.एस.११९१) सह संशयीत नेपाळीला ताब्यात घेतले. आरोपीने चौकशीत चारचाकी संगम नेर येथून (मूळ क्रमांक एम.एच.०४ एफ. झेड. ७६५२) असल्याचे सांगत ही चारचाकी साथीदार आर्यन खान (राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) सोबत संगमनेर येथून १० दिवसांपूर्वी
चोरल्याची कबुली दिली.

धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, हवालदार संतोष हिरे, प्रशांत चौधरी, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, धर्मेंद्र मोहिते, हर्षल चौधरी, सुशील शेंडे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोपीविरोधात राज्यभरात गुन्हे

आरोपी अजय कटवाल हा कुविख्यात आरोपी असून त्याच्याविरोधात मोहाडीनगर पोलिसात दोन, दोंडाईचा, चिपळूण, जि. रत्नागिरी येथे तीन, विश्रामबाग, सांगली येथे दोन, वर्ध्यातील रामनगर तसेच अमरावतीतील गाडगेनगर ठाण्यात दोन, अमरावतील नांदगाव ठाण्यात एक, उल्हानगरच्या अंबरनाथ ठाण्यात एक तसेच मध्यप्रदेशातील अनेक ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment