शोध – मानवी मनाचा

 

जीवन जिज्ञासा

 

मागील काही लेखांमधून आपण मानवाच्या अंगी निहित असलेल्या ‘भविष्यवेध सिद्धी’ सामर्थ्याच्या कथांचे चिंतन केले. त्यातील दोन कथा ऐतिहासिक कालखंडातील आहेत तर दोन कथा आधुनिक काळातील म्हणजे विज्ञान युगातील आहे.

त्यांना शोध त्या काळाला अनुसरून प्रायोगिक पद्धतीने, चिकित्सक पद्धतीने घेण्यात आला. त्यामुळे अशाप्रकारचे सामर्थ्य मानवाच्या ठिकाणी म्हणजे मानवी शरीरात असते, याचा पडताळा आला. याचे चिंतन भारतीय संस्कृतीत, हिंदू जीवन पद्धतीत जितके सखोल, सूक्ष्म, बहुआयामी स्तरावर झाले आहे तितके जगातील इतर कोणत्याही संस्कृतीत वा जीवन पद्धतीत झालेले नाही. हा अभिनिवेश नाही तर वस्तुस्थितीचे दर्शन आहे. त्याचमुळे भारतातील संतांनी मानव जन्माचे, मानवी देहाचे माहात्म्य त्यांच्या साहित्यात, ग्रंथांमध्ये भरभरून मांडले आहे. नरदेह हा अतिशय दुर्लभ आहे. त्याची प्राप्ती सहजासहजी होत नाही. पूर्व पुण्याईने त्याची प्राप्ती झाली आहे. त्याचा नीट विनियोग करा. मानवी देहातच विचार करण्याची शक्ती आहे. मानवालाच योग्य काय? अयोग्य काय? याचा निर्णय घेण्याची बुद्धी आहे. त्याचा नीट विनियोग करून ‘उत्कट भव्य तेचि घ्यावे मिळमिळीत अवघेचि टाकावे’ या निवडीने ‘याची देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा’ अशी अनुभूती घेऊन या नरदेहाचे सार्थक करा’, हाच आग्रह सर्व संतांनी जीवनभर केलेला आहे. वेद-उपनिषद काळापासून तो आधुनिक काळापर्यंत मानवी जीवन तत्त्वज्ञानाची हीच परंपरा प्रत्यक्ष काळाचा संदर्भ जरी वेगळा असला तरी राहिली आहे, हे आपल्या सहज लक्षात येईल. यालाच स्वामी विवेकानंदांनी ‘एसेंस ऑफ कल्चर’ असे म्हटले आहे तर योगी अरविंदांनी हाच आशय व्यक्त करताना ‘फंडॅमेन्टल डॉक्ट्रिन ऑफ इंडियन लाईफ अँड कल्चर’ असे संबोधिले आहे. एकूण आशय हाच आहे की, human mind मानवी जीवनाचे काहीतरी सार्थक करावे.

विज्ञानाला जेव्हा जाग येते…

परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीचे आणि human mind मानवी जीवनाचे चिंतन अनादिकाळापासून जगातील विविध सभ्यतांमध्ये म्हणजे संस्कृतीमध्ये होतच आले आहे. वैदिक ऋषींच्या अतींद्रिय विज्ञानावर आधारित वैदिक ज्ञानामुळे हिंदू संस्कृतीमध्ये हे चिंतन परिपूर्ण अवस्थेला गेले. ऋषिमुनींच्या आत्मचिंतनातून म्हणजे ‘कस्त्वम् कोऽहंम’ या जिज्ञासेतून प्रारंभ झालेला हा प्रवास शेवटी ‘अहं ब्रह्मास्मि’ या दिव्य अनुभूतीत परिपूर्ण अवस्थेला गेला आणि परमेष्ठीस्वरूप ‘सर्वं खाल्विदं ब्रह्म’ येथे संपला. म्हणजे व्यक्तिगत स्तरावर आणि संपूर्ण सृष्टीस्तरावर एकाच ब्रह्मभावनेची अनुभूती ही हिंदू तत्त्वज्ञानाची म्हणजेच अध्यात्मविद्येची परिपूर्णता समजली गेली. त्याचे आत्मभान म्हणजेच ‘सारे विश्वची माझे घर’ या विश्वात्मक भावनेने परिपूर्ण असलेली संतांची मांदियाळी या संस्कृतीत निर्माण झाली. भारतीय समाजाला, जीवनपद्धतीला अध्यात्माचे अधिष्ठान प्राप्त झाले. त्याच अधिष्ठानावर येथील सर्व परंपरा, रूढी, चालिरीती, विकसित झाल्यात. आजही त्याच मार्गावरून भारतीय जीवनपद्धतीची वाटचाल चालू आहे. पण पाश्चात्त्य संस्कृतीची वाटचाल ही बदलून भौतिकवादी परंपरेला अनुसरून झाली. विज्ञानाच्या दिशेने तिचा सांधा बदलला. त्यातून ‘विज्ञान वाद’ (मटेरियालिझम) निर्माण झाला. आज संपूर्ण जगातील मानवाची विभागणी ही ठळकपणे दोन विचारसरणींमध्ये म्हणजे भौतिकवादी विचारसरणी आणि अध्यात्मवादी विचारसरणीमध्ये विभाजित झाली आहे. अनादिकाळापासून मानवी जीवनाच्या या दोन मूलभूत प्रवृत्तींचे सूक्ष्म, तलस्पर्शी चिंतन भारतीय तत्त्वज्ञानात झाले आहे. उपनिषदांमधील प्रसिद्ध उपनिषद ‘कठोपनिषद’ आहे. यांत वरील दोन विचारसरणींचा उल्लेख ‘श्रेय’ आणि ‘प्रेय’ या नावाने केला असून पुढील विकासक्रमात याच संकल्पना हिंदू जीवनपद्धतीच्या प्रमुख आधारस्तंभ म्हणून मान्यता पावलेल्या ‘अभ्युदय’ आणि ‘नि:श्रेयस’ या महत्त्वाच्या जीवनधारणांमध्ये परावर्तित झाल्यात. त्यामुळे हिंदू जीवन पद्धतीचा प्रत्यक्ष व्यावहारिक स्तरावर ‘समतोल’ साधला गेला. ‘प्रपंच आणि परमार्थ’, ‘प्रवृत्ती आणि निवृत्ती’, ‘विवेक आणि वैराग्य’, ‘शास्त्र आणि शस्त्र’ यांचा समन्वय म्हणजे प्राचीनतम ‘हिंदू संस्कृती’-अशी ओळख निर्माण झाली. प्रसिद्ध इतिहासकार अनॉल्र्ड टॉयन्बी म्हणतात- ‘अमंगस्ट द ऑल कल्चर्स ऑफ द वल्र्ड, द इंडियन कल्चर इज द ओन्ली कल्चर वुईच हॅज साक्सिडेड् इन किपिंग द हारमोनियस कॉम्बिनेशन बिट्वीन ‘मटेरियालिझम’ अँड ‘स्पिरिच्युअ‍ॅलिझम’ (वल्र्ड थिंकर्स ऑन श्री रामकृष्ण मधून.)

हा समतोल पाश्चात्त्य संस्कृतीला मात्र साधता आला नाही. याचे कारण तिची एकांगी वाढ झाली. त्यासाठी आपल्याला तिच्या भौतिकवादी विकासाचा, वाटचालीचा इतिहास, पृष्ठभूमी पाहावी लागेल. त्याचे असे झाले-

सन १४५३ साली तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकले. त्यामुळे तेथील सर्व विद्वान असलेली, विविध शास्त्रांचा अभ्यास असणारी ग्रीक मंडळी युरोपकडे निघून गेली. त्यांच्या ज्ञानामुळे युरोपमध्ये एक नवचेतना निर्माण झाली. लोक जणू अज्ञानाच्या एका लांबच लांब निद्रेतून जागे झाले. ते प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान, विविध शास्त्रांचे ज्ञान याच्याशी परिचित होऊ लागले. भारतीय तत्त्वज्ञानाच्या म्हणजे वैदिक उद्घोषणेच्या परिभाषेत बोलायचे झाले तर त्यांचा आंतरिक प्रवास, वैचारिक प्रवास ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ यानुसार प्रारंभ झाला. युरोपच्या आधुनिक प्रवासात या बदलाला, परिवर्तनाला ‘रेनासन्स’ या नावाने संबोधतात. रेनासन्सची ही चळवळ पुढे इटली, फ्रान्स, इंग्लंड आणि नंतर संपूर्ण युरोपभर पसरली. या चळवळीमुळे मानवी जीवनाकडे, सृष्टीकडे, विज्ञानाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला. तो बदल म्हणजे ‘विज्ञानाच्या ‘कॉज अँड इफेक्ट’ यातील अविभाज्य संबंधामुळे जीवनमूल्य हे इंद्रियनिष्ठच असते. आपल्या पंचज्ञानेंद्रियांद्वारा जे अनुभवास येते तेवढेच खरे असते. त्यामुळे या सत्याच्या वा अनुभूतीच्या पलीकडे एक तर काहीही नाही आणि असले तरी त्याला काहीही महत्त्व देण्याचे कारण नाही. अशाप्रकारे खरे सत्य आणि खरे human mind जीवनमूल्य हे इंद्रियनिष्ठच असते अशी ‘जडदेहबुद्धी’ संतांनी म्हटल्याप्रमाणे जीवनाचा स्थायीभाव झाली आणि त्याचाच दृश्य परिणाम म्हणजे -‘ऋणं कृत्वा, घृतं पिवेत् यावाज्जिवं सुखं जीवे’ अशी ‘खाओ पियो मजा करो’, ‘इट ड्रिंक अँड बी मेरी’ हे इंद्रियनिष्ठ, सुखवादी, चंगळवादी तत्त्वज्ञान जीवनाचा ध्येयवाद झाला. जीवनाचा परम् पुरुषार्थ झाला.

सतराव्या शतकापासून विज्ञानाची प्रचंड प्रगती झाली. एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकापर्यंत भौतिकवादाचे, जडवादाचे प्राधान्य संपूर्ण जगात पसरले. त्यामुळे वा त्याला अभिप्रेत असलेल्या विचारसरणीप्रमाणे पंचज्ञानेंद्रियांना प्रतीत होणारे human mind अनुभवच सत्य मानण्याची प्रवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्येक अनुभव घासून पाहण्याची वृत्ती या गोष्टींचे प्राबल्य आणि स्तोम इतके माजले की, त्यामुळे आपल्याला येणारा अनुभव हाच एकमेव सत्य आणि इतर क्षेत्रातील म्हणजे काव्य, साहित्य आध्यात्म म्हणजे मनस् तत्त्वावर आधारित अनुभव असाच कल्पनेचा खेळ त्यामुळे स्वाभाविकच असत्य असे मानण्याची एक फॅशनच रूढ झाली होती. बुद्धिवादाच्या, सायंटिफिक थिंकिंगच्या गोंडस आवरणाखाली त्याचा उदो उदा करणे चालू होते. त्याचा अतिरेक झाल्याने मानवाच्या ठायी निसर्गत:च अस्तित्वात असलेल्या, ईश्वरप्रदत्त असलेल्या चैतन्यशक्तीकडे, अंगभूत सामर्थ्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. त्यामधूनच मग ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी’ असा भंजकवाद निर्माण झाला. सर्व काही पंचज्ञानेंदियांच्याच कक्षेत वा अनुभवाच्या मर्यादेत आहे. असा आभासी आत्मविश्वास (फाल्स कॉन्फिडन्स) निर्माण झाला. त्या आत्मविश्वासामुळे (चुकीचा असला तरी) स्वतःला विज्ञानवादी म्हणविणाऱ्यांमध्ये अतींद्रिय शक्तींवर प्रेम, विश्वास श्रद्धा असणाèयांची खुळे, वेडे, अंधश्रद्ध, जुनाट विचारसरणीचे, बुरसटलेल्या विचारांचे, अज्ञानी, मागासलेले, सनातनी, प्रतिगामी या प्रकारच्या शेलक्या वाक्ताडनाने संभावना होऊ लागली. पण हा काळही बदलला.

विज्ञान जसजसे सूक्ष्मतम (सटल) होत गेले त्या प्रमाणात मानवी मनाच्या सामर्थ्याची, परिणामकारकतेची, त्याच्या ठिकाणी असलेल्या ‘बियाँड स्पेस अँड टाईम’ या कालातीत सामर्थ्याची विज्ञान संशोधकांना जाणीव होऊ लागली. संशोधनाची अनेक क्षेत्रे निर्माण झालीत. त्यांत मानवदेह विज्ञान (फिजियॉलॉजी), मानवी मनाचे संशोधन (सायकॉलॉजी), उत्क्रांतिवाद (इन्होल्युशन), जीवशास्त्र (बायॉलॉजी), वनस्पतिशास्त्र, भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र इत्यादी सर्व शास्त्रांच्या सखोल अध्ययनामुळे ज्ञानाच्या कक्षा या प्रचंड प्रमाणात विस्तारित झाल्या. त्यामुळे अनेक घटनांमधील रहस्यांचा शोध लागला. अनाकलनीय गोष्टींचे आकलन होऊ लागले. त्याचाच परिणाम म्हणून विज्ञानाची ‘जितं मया’ची अहंकारी आणि अरेरावी भाषा बदलून त्या जागी स्वीकृतीचा भाव दर्शविणारी, अदृष्टाचे अस्तित्व मान्य करणारी भाषा आली. कळत नकळत शेक्सपिअरसारख्या प्रतिभावान साहित्यिकाच्या नाट्यकृतीतील पात्राच्या तोंडून ती व्यक्त होऊ लागली. शेक्सपिअरचे प्रसिद्ध नाटक ‘हॅमलेट’मध्ये हॅमलेटच्या तोंडी घातलेले, होरॅशियोला उद्देशून ‘देअर आर युवर थिंग्स इन हेवन अँड अर्थ होरॅशियो. वुईच आर इव्हन नॉट ड्रिम्ट इन युवर फिलॉसॉफी’ हे वाक्य त्याचेच प्रतीक आहे. द्योतक आहे. आधुनिक शास्त्रज्ञ, विचारवंत या भूमिकेवर आल्याने अतींद्रिय विज्ञानाच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळू लागले. त्याची गती वाढली. त्यातून मानवी मनाच्या संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले. human mind ‘मानवी मन’ ही एक स्वतंत्र गोष्ट आहे (एनटीटी) हे आता संशोधक मान्य करू लागले आहेत. हात-पाय-नाक-कान-डोळे या इंद्रियांप्रमाणे ते ‘दिसत’ नाही. (व्हिजिवल) पण तरी त्याचे अस्तित्व मान्यच करावे लागते. कारण ते मनच मानवी जीवनाचे ‘केन्द्रबिंदू’ आहे. मानवाच्या सर्व बाह्य आणि आंतरिक क्रियाशीलतेचा स्रोत आहे. त्यामुळे मन-मन म्हणून ज्याला म्हणतात ते आहे तरी काय? याचा शोध घेण्याची एक तीव्र जिज्ञासा संशोधकांच्या मनात निर्माण झाली. ती जिज्ञासा तृप्त करण्यासाठी त्यांनी या ‘मनाचा’ शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या प्रयत्नामधून, संशोधनातून त्यांना मनाचे स्वरूप, त्याच्या ठिकाणी असलेले सामथ्र्य हे लक्षात आले.

या शोध यात्रेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू या.

 

प्राचार्य. प्र.श्री. -डोरले