Republic Day : जळगावच्या शेतकऱ्याला दिल्लीत होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे आमंत्रण

जळगाव : दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालनासाठी बांबरुड (राणीचे) हल्ली मुक्काम पाचोरा (जि.जळगाव) येथील आदर्श शेतकरी बापूराव बडगुजर व त्यांच्या पत्नी ज्योती बडगुजर यांना येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विभाग पुणे व जिल्हा कृषी अध्यक्ष जळगाव यांच्यातर्फे बापूराव बडगुजर यांना हे सपत्नीक निमंत्रण प्राप्त झाले आहे. केंद्र शासन राष्ट्रीय कृषी विकासाच्या प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसवलेल्या प्रभावी कृषी विषयक कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात संचालन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते.

बापूसाहेब बडगुजर हे पाचोरा शहरातील एक प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. ते आपल्या शेतात कांदा, मोसंबी, गहू, हरभरा , केळी , मका सर्व पीक हे प्रति थेंब अधिक पीक ठिबक सिंचनाद्वारे ते उत्पन्न घेत असतात व त्या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव यांना सर्व प्रकारचे योजना व त्यांचा उत्पादन वाढवण्यासाठी सर्व प्रकारची मदत ते करत असतात. अशा दहा शेतकऱ्यांना या कार्यक्रमासाठी सपत्नीक आमंत्रित करण्यात आले असून त्यात पाचोरा येथील बापूराव बडगुजर व ज्योती बडगुजर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

२४ ते २६ जानेवारी दरम्यान त्यांना शासनातर्फे दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे. याबद्दल बडगुजर दांपत्याचे परिसरातून कौतुक होत आहे. आपल्या मोठ्या बंधूचे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्याध्यापक दिपक बडगुजर व त्यांच्या पत्नी बृहन्मुंबई महानगरपालिका पर्यवेक्षिका आनंदी बडगुजर यांनी बापूराव बडगुजर व ज्योती बडगुजर यांना अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या आहेत.