IPL २०२३ : प्रवास सोपा नाही पण अशक्यही नाही, RCB संघ ‘असा’ पोहचणार प्लेऑफमध्ये!

IPL 2023 : आयपीएल (2023) मध्ये  गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या दोन स्थानांवर आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. म्हणजेच सात संघांमध्ये प्लेऑफच्या शेवटच्या दोन जागांसाठी चुरस असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स आणि केकेआरच्या संघांनी ज्या प्रकारे जबरदस्त पुनरागमन केले आहे. ते पाहता शेवटच्या चार संघांच्या नावाचा अंदाज लावणे अद्याप सोपे नाही.

RCB अंतिम-4 मध्ये कसे पोहोचेल?
आरसीबीला प्रथम त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. सध्या हा संघ 11 पैकी पाच सामने जिंकून 10 गुणांसह गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे. तर पंजाब, कोलकाता, राजस्थान आणि लखनौला समान गुण आहेत. अशा स्थितीत या चार संघांमध्ये निकराची लढत होऊ शकते. त्यासाठी आरसीबीला त्यांच्या उर्वरित एका सामन्यात राजस्थानला पराभूत करावे लागेल. त्यामुळे संजू सॅमसनच्या संघाच्या आशा संपुष्टात येऊ शकतात आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील हा संघ प्लेऑफसाठी मजबूत होऊ शकतो.

याशिवाय, सनरायझर्सचाही पराभव करून, आरसीबी त्यांना स्पर्धेतून बाहेर काढून स्वतःचा मार्ग मजबूत करू शकतो. मग खरे आव्हान गुजरात टायटन्सचे असेल. जीटीला पराबवाचा सामना करावा लागला तरी फारसा फरक पडणार नाही पण तो सामना जिंकून आरसीबीला नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आता प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी पुढील सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे.