इंडियन प्रीमियर लीग 2024 चा हंगाम हा येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र अशातच पदार्पणानंतर पहिल्या दोन हंगामात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या गुजरात टायटन्स संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील जलद गोलंदाज आणि आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे प्रतिनिधीत्व करणारा स्टार मोहम्मद शमी या वर्षी आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकणार आहे.
बीसीसीआयमधील एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. शमीच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली असून त्याच्यावर लंडन येथे शस्त्रक्रिया होणार आहे. यामुळे गुजरात टायटन्सला हा मोठा धक्का मानला जात आहे.
T20 विश्वचषकही खेळणार नाही !
मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकापर्यंतही तंदुरुस्त होणार नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांना मैदानात उतरणे कठीण असल्याचा दावा केला जात आहे. टीम इंडियाला ऑक्टोबरमध्ये बांगलादेश आणि नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे.
शमी वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपर्यंतच पुनरागमन करू शकेल. प्रश्न असा आहे की शमीला वर्ल्ड कप फायनलमध्ये दुखापत झाली होती, तर त्याला आजपर्यंत योग्य उपचार का दिले गेले नाहीत ? येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीवर थेट प्रश्नचिन्ह येत आहे.