---Advertisement---
आयपीएल 2024 च्या लिलावात गेल्या 16 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. यावेळी सनरायझर्स हैदराबादने आयपीएल लिलावात एका खेळाडूला खरेदी करण्यासाठी तब्बल 20.50 कोटी रुपये खर्च केले आहेत. या खेळाडूची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती. पण लिलावात जवळपास प्रत्येक संघाने या खेळाडूवर बोली लावली आणि इतिहास रचला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. चेन्नई आणि मुंबईने कमिन्सला 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह खरेदी करण्यात रस दाखवला होता. नंतर आरसीबी आणि हैदराबादचे संघ या शर्यतीत सामील झाले. सरतेशेवटी, सनरायझर्स हैदराबाद संघाने पॅट कमिन्सला 20 कोटी 50 लाख रूपयांना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. लिलावात 20 कोटींचा आकडा गाठणारा पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.
सॅम कुरनचा विक्रम मोडला
गेल्या वर्षी इंग्लंडचा सॅम कुरन आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. 2 कोटींची मूळ किंमत असलेल्या सॅम कुरनला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या मोसमापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस (16.25 कोटी रुपये) हा सर्वात महागडा खेळाडू होता.
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
20.50 कोटी – पॅट कमिन्स
18.50 कोटी – सॅम करन
17.50 कोटी – कॅमेरून ग्रीन
16.25 कोटी – बेन स्टोक्स
16.25 कोटी – ख्रिस मॉरिस