IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्ससाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अलीकडेच मार्गदर्शक गौतम गंभीरने एलएसजी सोडल्यानंतर आता आणखी एका कोचिंग स्टाफने संघ सोडला आहे.
एलएसजीचे फलंदाजी प्रशिक्षक विजय दहिया आता संघाचा भाग नसल्याची माहिती फ्रँचायझीनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आयपीएलचा 17वा हंगाम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
19 डिसेंबर रोजी दुबई येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग मिनी लिलावाच्या काही दिवस आधी गंभीरने LSG ची साथ सोडली. यानंतर माजी भारतीय खेळाडू त्याच्या जुन्या फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला. गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरला दोनदा चॅम्पियन बनवले आहे आणि संघ मालकांना पुन्हा एकदा त्याच्याकडून अपेक्षा असतील.
पण, एलएसजीच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रथम गंभीर आणि आता दहिया यांच्या जाण्याने फ्रँचायझीला नवीन कोचिंग स्टाफची निवड करावी लागेल. एवढ्या कमी वेळात नवा कोचिंग स्टाफ संघातील खेळाडूंशी जुळवून घेऊ शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.