विशाखापट्टणम् : १८ व्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात सोमवारी येथे अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायण्ट्स यांच्यादरम्यान टी २० क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. हे दोन नवीन कर्णधार प्रथमच आमने-सामने येत असून दोघेही आपल्या आयपीएल मोहिमेची चांगली सुरुवात करण्यास उत्सुक असतील.
सलग दुसऱ्या वर्षी येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए स्टेडियम दिल्ली कॅपिटल्ससाठी दोन गृह सामने खेळले जाणार आहे.
ऋषभ पंत हा आपल्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू व त्यांचा कर्णधार होता. त्याने गत वर्षी मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघ सोडगी व लखनौ सुपर जायण्ट्सने त्याला २७ कोटी रुपयांच्या विक्रमी किमतीत विकत घेतले.
सर्वाधिक मानधनामुळे भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज या हंगामात चर्चेत राहील, परंतु अलिकडच्या चॅम्पियन्स चषकात त्याला एकही सामना मिळाला नाही म्हणून पंतला टी-२० मध्ये आपले स्थान मजबूत करण्याची मिळेल. दुसरीकडे, आयपीएलमध्ये पदार्पणापासून दोन वर्षे लखनौ सुपर जायण्ट्सचे नेतृत्व करणारा केएल राहुल दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला आह व तो त्यांच्या योजनांमध्ये एक महत्त्वात्चा खेळाडू असेल. तो एक कर्णधार म्हणून नव्हे, तर एक प्रमुख फलंदाज म्हणून कामगिरी करेल. भारतीय अष्टपैलू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.
मुंबई इंडियन्सप्रमाणे, दिल्ली संघालाही कर्णधार निवडताना पर्यायांची कमतरता भासली, कारण त्यांच्याकडे राहुल व्यतिरिक्त फाफ डु प्लेसिस सुद्धा आहे, परंतु फॅन्चायझीने अष्टपैलू पटेलला निवडले. एकंदरीत, कागदावर पाहता, परदेशी आणि भारतीय खेळाडूंच्या समृद्ध मिश्रणासाठी दिल्ली कॅपिटल्स एक भक्कम संघ म्हणून समोर येत आहे, तर लखनौ संघाकडे काम करण्यासाठी केवळ सहा परदेशी खेळाडू आहेत. दिल्लीकडे अनुभवी फलंदाज फाफ डु प्लेसिस व ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क सुद्धा आहे.
करुण नायरच्या स्थानिक क्रिकेटमधील समृद्ध कामगिरीमुळे दिल्लीची मधली फळी धोकादायक दिसते, यात राहुल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी व आशुतोष शर्मा यांचाही समावेश आहे. दिल्लीने आघाडीचे भारतीय फिरकी गोलंदाज पटेल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकी आतक्रमणामुळे त्यांची गोलंदाजी मजबूत झाली आहे, तर वेगवान गोलंदाज टी. नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार व दुष्मंथा चमीरा यांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतीय खेळाडूंचा समृद्ध गट परदेशी खेळाडूंसोबत चांगले जुळवून घेऊन विजयांची मालिका एकत्र करेल अशी आशा लखनौ सुपर जायण्ट्सला आहे. मिशेल मार्श केवळ एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून उपलब्ध असला तरी, लखनौला दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर व एडन मार्कराम या जोडीकडून भरीव पुनरागमनाची अपेक्षा असेल. लखनौकडे निकोलस पूरनच्या रूपात एक परिपूर्ण आक्रमक फलंदाज आहे. आयुष बदोनी, अब्दुल समद व शाहबाज अहमद या इतर भारतीय फलंदाजांकडूनही खूप आशा आहे.
तथापि, गोलंदाजी ही लखनौसाठी चिंतेची बाब आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मयंक यादव, आवेश खान व आकाश दीप दुखापतींमुळे पुनर्वसन करत आहेत. तथापि, शार्दुल ठाकूरच्या समावेशामुळे लखनौ संघाला बळकटी मिळाली आहे. या अनुभवी अष्टपैलू खेळाडूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.