Digvesh Rathi : दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यातील भांडणावर कारवाई होऊ शकते अशी अपेक्षा होती, तसेच घडले आहे. दिग्वेश राठी यांना निलंबित करण्यात आले आहे.
आयपीएलने एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या हंगामात दिग्वेश राठी लेव्हल १ मध्ये दोषी आढळण्याची ही तिसरी वेळ आहे. तिसऱ्यांदा दोषी आढळल्यानंतर, त्याचे आता ५ डिमेरिट पॉइंट्स आहेत, ज्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
१ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात आयपीएल २०२५ एलएसजीचा दिग्वेश राठी पहिल्यांदा लेव्हल १ अंतर्गत दोषी आढळला. त्यानंतर, ४ एप्रिल २०२५ रोजी, मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्यांदा, तो लेव्हल १ अंतर्गत दोषी आढळला. या हंगामात ५ डिमेरिट पॉइंट्स मिळाल्याने त्याच्यावर १ सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ असा की तो २२ मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात एलएसजीकडून खेळू शकणार नाही.
नेमकं काय घडलं ?
दिग्वेशने विकेट घेतल्यावर अभिषेक शर्माशी वाद घातला. विकेट घेतल्यानंतर, राठीने त्याच्या परिचित शैलीत नोटबुक सेलिब्रेशन केले. आणि अभिषेक शर्माला मैदान सोडण्याचा इशाराही केला. यावर अभिषेक शर्माला राग आला आणि दोघांमध्ये भांडण झाले. दोघांनाही जवळ येत असल्याचे पाहून पंचांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती शांत केली.
अभिषेक शर्माची मॅच फी कापली
दिग्वेश राठीवर भांडण केल्याबद्दल बंदी घालण्यात आली, तर अभिषेक शर्माच्या पहिल्या चुकीबद्दल त्याच्या मॅच फी २५ टक्के कपात करण्यात आली आहे.