---Advertisement---

IPL 2025 Final: यंदा ‘हा’ संघ जिंकणार आयपीएल ट्रॉफी आणि ‘हा’ खेळाडू ठरणार सामनावीर, चॅम्पियन कर्णधाराने केली भविष्यवाणी

---Advertisement---

IPL 2025 Final: आयपीएल २०२५ च्या फायनसाठी आज अंतिम संघ मिळणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत जाईल तर पराभूत संघाचे स्वप्न भंगणार आहे.

दरम्यान, आयपीएल 2025 च्या फायनलबाबत अनेक खेडाळु तर्क वितर्क लावत आहे. अश्यातच दिल्ली कॅपिटलचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मोठे भाकीत केले आहे. एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देतांना त्याने हे भाकीत केले आहे. तसेच त्याने अंतिम सामन्यात कोण सामनावीर ठरणार आहे याचे सुद्धा भाकीत केले आहे.

एका चाहत्याने डेव्हिड वॉर्नरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर विचारले की, यावर्षी आयपीएल फायनल कोण जिंकणार? या प्रश्नाच्या उत्तरात वॉर्नर म्हणाला की, यावर्षी फायनल ‘आरसीबी’ जिंकणार असून ‘जोश हेझलवुड’ हा सामनावीर ठरणार आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या या भाकितामुळे आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १८ वर्षांनंतर आरसीबी विजेतेपद जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. या काळात विराट कोहलीची लेडी लक अनुष्का शर्मा संघाला पाठिंबा देण्यासाठी कोहलीसोबत अहमदाबादला पोहोचली आहे. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment