लखनौ : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) हंगामात शुक्रवारी १६ व्या सामन्यात लखनौ सुपर जायण्ट्स मुंबई इंडियन्सविरुद्ध सलग दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर सामना खेळणार आहेत.
दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत अव्वल चारच्या बाहेर आहेत आणि या सामन्यात त्यांच्या मागील सामन्यांपेक्षा वेगळे निकाल आहेत. लखनौला पंजाब किंग्जकडून ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला, तर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ८ गड्यांनी विजय नोंदविला. लखनौने तीन सामन्यांपैकी एक विजय व दोन पराभव पत्करले, तर मुंबईने दोन पराभवानंतर आपला पहिला विज य नोंदविला. मुंबई व लखनौचे प्रत्येकी २ गुण असून ते अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर आहे.
गत सामन्यातील विजयामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास बळावलेला असेल व ते या विजयाची लय कायम राखण्यास उत्सुक असतील. तिकडे गत सामन्यातील पराभवानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्यास उत्सुक असेल.पहिल्या सहा षटकांमधील मिचेल मार्श आणि टेंट बोल्ट यांच्यातील लढाई लखनौ विरुद्ध मुंबईदरम्यानचा सामना कोणत्या दिशेने जाईल हे ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, कारण मिचेल मार्श गत काही सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याने पॉवरप्लेचा पुरेपूर वापर केला आहे.
दुसरीकडे, बोल्टने केकेआर विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात आपला सर्वोत्तम गोलंदाजी अनुभवली. त्याने स्कोअरिंग रेट मर्यादित करण्यासाठी नरेनचा महत्त्वाचा बळी विकेट घेतला. अनुभवी वेगवान गोलंदाज लखनौविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची आशा करेल सध्याच्या आयपीएल हंगामात लखनौसाठी फलंदाजीने उत्तम फॉर्ममध्ये असलेला निकोलस पूरन मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करण्यास उत्सुक असेल. पूरनचा सामना लेग स्पिनर विघ्नेश पुथूरशी होऊ शकतो व तो पूरनचा बळी घेण्याचा प्रयत्न करेल या हंगामात आतापर्यंत धावा कमी असलेला रोहित शर्मा लखनौ विरुद्ध मुंबई सामन्यात शार्दुल ठाकूरचा सामना करेल. आतापर्यंत हंगामातील आघाडीच्या बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या ठाकूरला गोलंदाजी करण्याची सवय आहे.
पंजाब किंग्जने पॉवरप्लेमध्ये लखनौ संघाचा पराभव केला आणि त्यांना बचावासाठी ऑरेंज कॅप धारक निकोलस पूरनकडून मदतीची आशा होती, परंतु तो ३० चेंडूत ४४ धावा करू शकला. आयुष बदोनीने (३३ चेंडूत ४१) पुन्हा एकदा संघाची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला व अब्दुल सामदने (१२ चेंडूत २७) शेवटी महत्त्वाचे फटके मारून एकूण धावसंख्येला काही सन्मान दिला. प्रभसिमरन सिंग (३४ चेंडूत ६९ धावा) आणि श्रेयस अय्यर (३० चेंडूत ५२ धावा) यांनी धमाकेदार अर्धशतके झळकावत लक्ष्य साध्य केले, तर नेहल वधेराने २५ चेंडूत नाबाद ४३ धावांची खेळी केली. पंजाबने १७२ धावांचे लक्ष्य आठ गडी राखून गाठले. दिग्वेश राठीने पंजाबचे दोन गडी बाद केले.
मुंबई इंडियन्सचा गत सामना सोपा होता, त्यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर केकेआरचा आठ गड्यांनी आरामात पराभव केला. ट्रेंट बोल्ट व दीपक चहरने पॉवरप्लेमध्ये पाहुण्यांना धुव्वा उडवला. मुंबई इंडियन्सच्या पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमारने ४ ब ळी टिपण्याची किमया केली. केकेआरचा डाव ११६ धावांवरच आटोपला. रायन रिकेल्टन (नाबाद ६१) व सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे यजमान मुंबई इंडियन्स संघाने अवघ्या १२.५ षटकांतच विजयाचे लक्ष्य गाठले.