IPL 2025 Players Retention । आयपीएल २०२५ लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी कोण कोणत्या खेळाडूंना संघात रिटेन केलंय याची यादी समोर आली आहे. यात अनेक मोठ्या खेळाडूंना रिटेन केलं नाहीय. त्यामुळे अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडू यंदाच्या लिलावात सहभागी होताना दिसणार आहेत. यामध्ये केएल राहुलला, ऋषभ पंत, आर अश्विन, श्रेयस अय्यर, इशान किशन अशा खेळाडूंचा समावेश आहे.
सीएसके
चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनी, रुतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि मथिशा पाथिराना यांना कायम ठेवले आहे.
आरसीबी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहलीला 21 कोटी, रजत पाटीदारला 11 कोटी आणि यश दयालला 5 कोटींमध्ये कायम ठेवले आहे.
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना कायम ठेवले आहे. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांचा रिटेन्शन लिस्टमध्ये समावेश आहे.
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स संघाने राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवातिया आणि शाहरुख खान यांना संघात कायम केले आहे.
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा यांना संघात कायम केले आहे.
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद संघाने पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेन्रिक क्लासेन आणि ट्रेविस हेड यांना संघात कायम केले आहे.
पंजाब किंग्स
पंजाब किंग्सने शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग या दोघांनाच संघात कायम केले आहे.
लखनौ सुपर जायंट्स
लखनौ संघाने निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान आणि आयुष बदोनी यांना संघात कायम केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाताने रिंकु सिंग, वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण, आंद्रे रसेल, हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांना संघात कायम केले आहे.
दिल्ली कॅपिटल्स
दिल्लीने अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांना संघात कायम केले आहे.
हे खेळाडू संघातून बाेहर
केएल राहुलला लखनौ सुपर जायंट्स, ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स, श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्स, जॉस बटलर आणि युजवेंद्र चहलला राजस्थान रॉयल्सने संघातून करारमुक्त केले आहे.