---Advertisement---

IPL 2025 : जोफ्रा आर्चर विराट-साल्टला रोखणार?

---Advertisement---

जयपूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज दुपारी 3.30 वाजता येथे आयपीएलचा (IPL2025) सामना होत आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सामन्याला कलाटणी देण्यात यश मिळवले आहे. १४४ किमी प्रतितास वेगाने अथक गोलंदाजी करताना इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धक्का दिला. त्याने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात २५ धावांत ३ बळींचा निर्णायक स्पेल दिला. फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरच्या यष्टीला १४८.६ किमी प्रतितास वेगाने उडवून सामन्यात चमक आणली. त्याने या आठवड्याच्या सुरुवातीला गुजरात टायटन्सविरुद्ध १५२.३ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आणि कर्णधार शुभमन गिलला १४७.७किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करताना तंबूत परत पाठवले.

आता बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चरवर कोहली (१८६ धावा) व इंग्लंडचा सहकारी फिल सॉल्ट (१४३ धावा) यांच्याविरुद्ध महत्त्वपूर्ण गोलंदाजी करण्याची जबाबदारी असेल. ही जोडी काही षटकांतच सामना जिंकून त्यामुळे त्यांना रोखण्याची जबाबदारी आर्चरवर असेल. आर्चरला संदीप शर्मा, महेश थिक्षणा व युधवीर सिंग यांचीही साथ मिळणे अपेक्षित आहे. कारण या गोलंदाजांना धावसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे, त्याचा फायदा आरसीबीचे फलंदाज घेऊ शकतील.

कोहलीने या हंगामात दोन अर्धशतके झळकावली आहे. फिल सॉल्टसोबत कोहलीला नियंत्रित आक्रमकता दाखवण्याची संधी मिळाली आहे. देवदत्त पडिक्कल सुद्धा निराशाजनक पुनरागमनानंतर मोठी धावसंख्या उभारण्यास उत्सुक असेल. फॉर्मात असलेला आरसीबी कर्णधार रजत पाटीदार, टिम डेव्हिड आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्याकडूनही प्रभावी कामगिरीची आशा आहे. बंगळुरू संघ अजूनही पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या शोधात असून त्यांच्याकडे जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमारसारखे मजबूत वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संघाला पराभवानंतर गुजरातविरुद्धच्या फलंदाजी पुनरुज्जीवनाची आशा असेल. राजस्थानकडे संजू सॅमसन, रियान पराग, यशस्वी जयस्वाल व नितीश राणा याचा समावेश असलेल्या मजबूत फलंदाजीचा विभाग आहेत. ध्रुव जुरेल व शिमरॉन हेटमायर या धडाकेबाज जोडी आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment