IPL 2025 : राजस्थानने धमाकेदार सुरुवात केली, मात्र पंधरा षटकानंतर त्यांची आशा संपुष्टात आली. या सामन्यात पंजाब किंग्सने बाजी मारली आहे. या सामन्याच्या मध्यभागी पंजाब किंग्जला त्यांचा कर्णधार बदलावा लागला आहे.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला सामन्याच्या एक दिवस आधी सराव सत्रादरम्यान त्याच्या तर्जनीला खोल दुखापत झाली. पण त्याने राजस्थानविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीही केली. पण पंजाबचा डाव संपल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या जागी हरप्रीत ब्रारला इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात आणण्यात आले. म्हणजे श्रेयस अय्यर या सामन्यात मैदानात उतरला नाही. अशा परिस्थितीत, अनकॅप्ड खेळाडू शशांक सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
श्रेयस अय्यर टॉससाठी मैदानात आला तेव्हा त्याच्या बोटाला पट्टी बांधलेली होती. यानंतर तो ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने २५ चेंडूत ३० धावांची खेळी केली. अय्यरने १२० च्या स्ट्राईक रेटने हे धावा केल्या, ज्यामध्ये ५ चौकारांचा समावेश होता. दुसरीकडे, शशांक सिंगने स्फोटक खेळी केली. तो ३० चेंडूत ५९ धावा करत नाबाद राहिला. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. शशांक सिंगचा स्ट्राईक रेटही १९६.६६ होता.
शशांक सिंगने या हंगामात संघासाठी खूप महत्त्वाच्या धावा केल्या आहेत. त्याने १२ सामन्यांच्या १० डावात २७३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २ अर्धशतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने हे धावा ६८.२५ च्या सरासरीने केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेटही १५१.६६ आहे. आयपीएल २०२४ पासून तो सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर खेळताना सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज आहे. त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत.