IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे वेळापत्रक पुन्हा एकदा बदलण्यात आले आहे. भारत-पाक तणावाच्या परिस्थितीनंतर या लीगचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा असेच काहीसे दिसून आले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, २३ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बेंगळुरूमध्ये खेळायचा असलेला सामना आता तिथे होणार नाही. तो सामना आता लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळला जाईल. बेंगळुरूचे हवामान लक्षात घेऊन बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. खरंतर, येत्या २-३ दिवसांत दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील सामना वाया जाण्याची शक्यता होती आणि म्हणूनच आयपीएल आयोजकांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
आयपीएलच्या या निर्णयानंतर, आरसीबीला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने घराबाहेर खेळावे लागतील. २३ मे रोजी आरसीबीचा सामना हैदराबादशी होईल. २७ मे रोजी लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध खेळायचे आहे. म्हणजे आता बेंगळुरूमध्ये सामना होणार नाही.
दिग्वेश राठीवर बंदी
Digvesh Rathi : दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यातील भांडणावर कारवाई होऊ शकते अशी अपेक्षा होती, तसेच घडले आहे. दिग्वेश राठी यांना निलंबित करण्यात आले आहे.
आयपीएलने एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या हंगामात दिग्वेश राठी लेव्हल १ मध्ये दोषी आढळण्याची ही तिसरी वेळ आहे. तिसऱ्यांदा दोषी आढळल्यानंतर, त्याचे आता ५ डिमेरिट पॉइंट्स आहेत, ज्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
१ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात आयपीएल २०२५ एलएसजीचा दिग्वेश राठी पहिल्यांदा लेव्हल १ अंतर्गत दोषी आढळला. त्यानंतर, ४ एप्रिल २०२५ रोजी, मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्यांदा, तो लेव्हल १ अंतर्गत दोषी आढळला. या हंगामात ५ डिमेरिट पॉइंट्स मिळाल्याने त्याच्यावर १ सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ असा की तो २२ मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात एलएसजीकडून खेळू शकणार नाही.