IPL 2025 : आयपीएलचे (IPL 2025) सत्र अंतिम टप्पात आले आहे; पण प्ल्येऑफबाबत सांगणे कठीण आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएल सामन्यात अनेक वादग्रस्त घटना घडल्या, ज्या आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आयपीएल (IPL 2025) स्पर्धेत शनिवारी (३ मे) रोजी चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केवळ २ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विशेषतः या सामन्यात एक वादग्रस्त घटना घडली, ज्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
ब्रेव्हिस हा पहिलाच चेंडू खेळत होता, यावेळी एनगीडीने टाकलेला फुटटॉस ब्रेव्हिसच्या पॅडला लागला. बंगळुरूच्या अपीलवर अंपायर यांनी फार विचार न करता लागलीच ब्रेव्हिसला बाद दिले.
ब्रेव्हिसने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. पण डीआरएस घेण्यासाठीचे १५ सेकंद संपले असल्याने अंपायर यांनी ब्रेव्हिसला माघारी जाण्यास सांगितले. यावरून जडेजा अंपायर्ससोबत वाद घालतानाही दिसला.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात एक धाव घेण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल रन आऊट झाला. गिल क्रिजमध्ये पोहोचण्यापूर्वी बेल्स उडवल्या गेल्या होत्या. चौथ्या अम्पायरने अनेकदा रिल्पे पाहिल्यानंतर गिलला बाद दिले. पण या निर्णयावर गिल प्रचंड संतापल्याचे दिसून आले.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीने ४२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. मात्र, या सामन्यादरम्यान तो संतापल्याचंही बघायला मिळालं. यावेळी त्याने रागाच्या भरात टोपीही जमिनीवर फेकली. सूर्यकुमारचा झेल सुटल्याने विराट कोहलीला राग अनावर आला. तो रागाच्या भरात यश दयाल आणि यष्टीरक्षक जितेश शर्मा याच्यावर ओरडला. कोहलीच्या या कृत्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.